सगळीच महाविद्यालये अनुदानित नसतात
नसतात सगळीच विनानुदानित
हे कळेलच माझ्या मुलाला,कधी ना कधी
मात्र त्यास हे देखील सांगा की
विद्यापीठ कार्यक्षेत्र असते विद्यादानाचे तसेच राजकारणाचेही गुण वाढविणारे असतात विद्यापिठात तसे गुणवानांना नापास करणारेही
असतात कापी पकडणारे पर्यवेक्षक तसे
कापी पुरविणारे प्राध्यापकही मला माहित आहे सगळ्या गोष्टी एकदम नाही सांगता येत तरीही आपणास वेळ मिळाला तर सांगा
विद्यापिठात घाम गाळल्याशिवाय पगार मिळतो ,
पुन्हा सांगा, हा बौद्धीक कष्टाचा पैसा आहे.
गुण कसे वाढवून आणावेत ते त्याला सांगा आणि
सांगा ते गुप्त राखायला
तुमच्याकडे युक्ती असेल तर त्याला
अभ्यासापासून दूर रहायला सांगा
सांगा त्याला कापी करून पास व्हायला
प्राध्यापकांना भित जावू नको म्हणाव,
त्यांनाच भिती असते सांगावं
जमेल तेवढं दाखवित चला त्याला
विद्यापिठात धूळ खात पडलेल्या ग्रंथाचे दूर्देव
मात्र त्याबरोबरच होऊ द्या त्याच्या मनाला अस्वस्थ,
बघू द्या त्याला,विद्येच्या कुरणावर चरणारी पिलावळ आणि पाहु द्या प्रवेशासाठी गर्दी
इकडून तिकडे घिरट्या घालणारे भिकार मजनू आणि विद्यापिठात त्याला हा धडा मिळू द्या
सरळ आलेल्या अपयशापेक्षा फसवून मिळवलेले यश श्रेयस्कर आहे
आपला भ्रष्टाचार आपली गुंडेगिरी याच्यावर
विश्वास ठेवायला हवा त्यानं,बेहतर आहे
प्राध्यापकांनी चूक ठरवलं तरी
त्यानं भल्यांना सतवावं आणि टग्यासमोर नमून वागावं कारण तिथे तो कमी पडेल
संकोच वाटत नसेल तर,त्याला सांगा
जिकडे पोरी तिकडे पोरी तिकडे धावत सुटणाऱ्या पोरांत सामिल होण्याची ताकद त्याने कमवायला हवी पुढे हेही सांगा त्याला
ऐकावं प्राध्यापकांचं,अगदी सर्व प्राध्यापकांचं
पण गाळुन घ्यावं परीक्षेच्या चाळणीतून
परीक्षेपुरतं तेवढं घ्यावं बाकी विसरून जावं
गरज असेल तर त्याला सांगा
गप्प. रहावं विद्यापीठातील सारा गोंधळ बघून
आणि म्हणावं त्याला ,कापी करायची लाज वाटू देवू नको.
त्याला सांगा परीक्षेला तुच्छ मानायला आणि
अभ्यासापासून. दूर रहायला.
त्याला हे पुरेपुर समजावं की,करावी किमान कमाई त्याने वह्या आणि पुस्तके विकून आणि
कधीही वाचू आणि लिहू नये.
उपदेश करणाऱ्याच्या झुंडी आल्या तर
दूर्लक्ष करायला सांगा त्याला आणि ठसवा त्याच्या मनावर,सत्य आणि न्याय कालबाह्य झाले त्याच्या फंदात पडू नको म्हणावं
त्याला शिकवू नका पण नकल करू द्या
त्याला सांगा विद्यापीठात उलटसुलट केल्याविना शिक्षण फायदेशीर ठरत नसतं
आणि असे करता येणे हेच शिक्षण असतं
त्याच्या मनी रंगवा भविष्याचं स्वप्न
धरला पाहिजे धीर जर करायची असेल पोटासाठी चाकरी आणखी एक सांगा त्याला ,आपला अढळ विश्वास पाहिजे विद्यापिठावर ,
तरच टिकेल ते अंधश्रद्धेवर
माफ करू नका कुलगुरू साहेब
मला असे लिहिण्याची सवयच आहे
तुम्हाला काय वाटायचे ते वाटो
त्याची मला पर्वा नाही पण
माझा मुलगा शहाणा व्हावयास हवा कारण तो भलताच वेडा आहे.
एक पालक
ना.रा.खराद