नाद

                                     नाद
                                               - ना.रा.खराद
नाद,ध्वनि किंवा आवाज सतत आपल्या कानावर पडत असतो.कुणाचे बोलणे देखील नाद असतो,इतकेच नाही तर स्वत:चे बोलणे देखील आपण स्वत: ऐकतो.केवळ बोलणेच नाही,ओरडणे ,खेकसणे व इतर वाणीवाटे निघणारे सर्व आवाज, ज्यामध्ये घोरणे,खोकणे हे सर्व आले.सतत कानी पडणारे आवाज आपल्या ओळखीचे होऊन जातात,प्राणी देखील ते ओळखतात.
आपले सर्व जीवन विविध प्रकारच्या आवाजाने किंवा ध्वनिने व्यापलेले आहे.हा नाद एक प्रकारचे संगीत आहे.कोणतातरी आवाज 👂 कानी पडल्याशिवाय कर्ण समाधान पावत नाही.सतत उघडे असलेले कान शेंकडों प्रकारचे आवाज आपल्या पर्यंत पोहचविण्याचे कार्य करतात.कळत नकळत आपण या आवाजाभोवती गुरफटलेले असतो.
रोज पहाटे गल्लीमध्ये तोंड धूतांना एखाद्या वृद्ध माणसाचा आवाज वातावरणात एक नाद उत्पन्न करतो.जाग येण्यापूर्वी पक्षांची किलबिल माणसाचे एकटेपण घालवते.आपल्यासोबतीला अजून कुणीतरी आहे याची जाणीव करुन देते.पहाटे नळावर भांड्यांचा नाद कानात घुमतो.तो ऐकल्याविना पहाट कशी सुनी लागते.
मस्जिदीमधील अजान असो किंवा मंदिरातले भजन असो गावभर त्याचा नाद घुमतो .
शाळा भरण्याची आणि सुटण्याची घंटा गावभर आपला नाद पसरविते.मुले त्या आवाजाने आंदोलीत होतात.गाववासियांना देखील त्या आवाजाची सवय होऊन जाते.मंदिरासमोर वाजणारा डफ असो की कुणी विक्रेते असो ,त्या आवाजाने जीवन रसमय होते.
  घरामध्ये देखील विविध भांड्यांचा आपला एकनाद असतो.चहाची कपबशी वाजली की अंग रोमांचित होते.विविध चमचे,ताटल्या वगैरे संगीत साहित्यच आहे.कुठे लग्न वगैरे असले की बाजा वाजतो.गावभर त्याचा नाद पसरतो.आनंदालाभरते येते.गावात एखाद्या येणाऱ्या बसचा आवाज कुतुहलाचा विषय असतो.मन उचंबळत असते.नियमितपणे मंदिरासमोर वाजणारा डफ असो की आरतीची घंटी असो.वातावरण मंगलमय करते.
नको असलेले अनेक आवाज कानी पडत असतात.मोटर वाहने, कारखाने परिसरात
   एक नाद निर्माण करतात.रात्रीच्या निरव शांततेत कुत्र्यांचे भूंकणे एक वेगळाच नाद निर्माण करतो.
वारे सुटले की झाडांचा ध्वनि मनामध्ये एक वेगळाच कैफ तयार करतो.एखाद्या धबधब्याचा किंवा समुद्राच्या लाटांचा आवाज वातावरण दणाणून सोडतो.घरामध्ये लहान मुलांची किलबिल किंवा 🐈 मांजरांचा आवाज जगण्यातील गोडी वाढवतो.
घड्याळाची टिकटिक कातर वाटू लागते.पहाटे कोंबड्याची बाग आपणास नवा उल्लास देते.गायी वासरांचे हंबरणे आपणास वात्सल्याची जाणीव करुन देते. विविध प्रकारच्या आवाजाने जीवन समृद्ध झालेले असते.हा नाद जीवनसंगीत आहे.
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.