बायकांचे घरगुती व्यायाम!
- ना.रा.खराद
उत्तम आरोग्यासाठी व्यायाम आवश्यक असतो.स्री आणि पुरुष उभयतांना त्याची गरज असते.
शारिरिक श्रम करणारांना व्यायामाची गरज नसते, परंतु बैठे काम करणारांना किंवा काही काम न करणारांना
व्यायामाची नितांत गरज असते आणि वरील प्रकारात मोडणारी माणसे सकाळ संध्याकाळ रस्त्यावर धावताना दिसतात.
सकाळच्या झाडझूड पासून बायकांचा व्यायाम सुरू होतो.दळण कांडण करणे ,धान्यातून अलगद खडे बाहेर काढणे, डोक्यावर लाकडे वाहणे,दगडावर कपडे आदळणे,पाळणे यामुळे शरीर सुडौल होत असे.व्यायामासारखी
या कामांना प्रतिष्ठा मिळायला हवी होती.
फिरणारांची वाढती संख्या बघता सुख साधनांचा वापर वाढल्याचे दिसून येते.
तरुण वयापेक्षा उतरत्या वयात व्यायामाची गरज भासू लागते.बसून खायला लागले की
उठून पळावे लागते.बहुतेक डाक्टर देखील 'फिरायला जा' असा सल्ला देतात.
विवाहित स्त्रियांना मात्र प्रचलित व्यायामाची गरज पडत नाही.ती फक्त खरी गृहिणी म्हणजे ,घरगुती कामे स्वतः करणारी स्री हवी.नसता धुणीभांडी व स्वयंपाकाला बाई असेल तर बाईसाहेबांना व्यायामाची
गरज पडते.लट्ठपणाने ग्रासलेल्या विवाहित स्त्रिया ,वजन कमी करण्यासाठी रस्त्यावर धावताना दिसतात, तेव्हा त्यांची किव येते.🏡 घरातली सर्व कामे स्वतः केली की कसे समाधान वाटते.
हल्ली अनेक बायकां विविध ठिकाणी विविध प्रकारचे व्यायाम करताना दिसतात.
घरी नोकरानी काम करते.परंतू ज्या विवाहित स्त्रिया सर्व कामे स्वतः करतात, त्यांना कुठल्याही व्यायामाची गरज पडत नाही.जात्यावर पहाटे उठून दळण दळणे हा साधा व्यायाम प्रकार आहे का? असे व्यायामाचे अनेक प्रकार बायकांच्या अंगवळणी पडलेले असतात.बळाचा वापर
केल्याने बळ वाढत असते.
धुणी धुणे हा नियमित व्यायाम आहे.पूर्ण ताकतीने कपडालत्ता दगडावर आदळावा
लागतो.धुतलेला कपडा पिळून काढणे हा त्याचा उपप्रकार.
भांडी घासणे हा व्यायाम सतत सुरू असतो.लहान वाटी पासून तर मोठमोठी भांडी आतून बाहेरून घासताना किती व्यायाम घडत असेल . पोळ्या लाटणे,भाकरी थापणे ,पाण्याची घागर उचलणे ,पाट्यावर मसाला वाटणे,
मुसळीने धान्य 🌽 कुटणे,सुपात फटकणे,कपडे झटकणे असले विविध व्यायाम स्वावलंबी बायकांचे सुरू असतात.कष्टकरी बायकां त्यामुळेच रस्त्यावर धावताना दिसत नाहीत.
घरगुती कामातून घडणारा व्यायाम स्त्रियांना कणखर बनवतो.निरोगी व समाधानी ठेवतो.सुखाच्या साधनांची रेलचेल आपणास आळसी बनवते आणि त्यातूनच शारिरीक समस्या निर्माण होतात,त्यासाठी
आपण आपली कामे स्वतः केली पाहिजेत.