एकदा एका शाळेची सहल कोकणामध्ये गणपती पुळे या ठिकाणी गेली होती.सोबत शाळेतील पाच शिक्षकही होते.मुले खुप आनंदी होती.मौजमजा करत होती.मुलांमध्ये काही श्रीमंतांची मुले होती.पैशाची खुपच उधळपट्टी करत होती.शिक्षक विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवून होते.गैरवर्तन केल्यास खरडपट्टी काढत होते.
मुलांमध्ये एक मंत्र्याचा मुलगा होता.तो भलताच शेफारला होता.वाटेल तसे वागत होता.सूचनांचे पालन करत नव्हता.यावर त्यातील एकाशिक्षकाने त्यास चांगलेच सुनावले.त्यास हे अनपेक्षित होते.कारण त्या मुलाचा बाप शाळेचा
अध्यक्ष होता.त्याने झालेला प्रकार आपल्या वडीलास फोनवर सांगितला.वडीलांनी परत आल्यावर बघतो,अशी समजूत काढली.तो मुलगाही मनामधे ,आता कळेल या मास्तरड्यालाअसेपुटपुटत होता.
सहल परतली,दूसऱ्या दिवशी त्या शिक्षकाला
अध्यक्षाचा निरोप आला.बंगल्यावर बोलावले होते.शिक्षकास बोलावण्याचे कारण लक्षात आले.परंतु ते शिक्षक निश्चिंत होते.तो विद्यार्थी
"आता कळेल मला खडसावणे काय असते.!'
ते शिक्षक जेव्हा मंत्र्याच्या बंगल्याजवळ आले.रस्त्यावर फूले अंथरलेली होती. स्वागताचे फलक होते.बैंड वाजत होता.समोर स्वागतासाठी मंत्री उभा होते,शिक्षक चक्रावून गेले,हा काय प्रकार त्यांच्या लक्षात येईना, मंत्री महोदयांनी त्या शिक्षकास म्हंटले," तुम्ही माझ्या मुलास शिक्षा केली?" शिक्षकाने नम्र व निर्भयपणे म्हंटले,” हो ते खरेच आहे." शिक्षकाचे ते बाणेदार उत्तर ऐकून मंत्री
महोदय आनंदीत झाले, आणि म्हणाले
"ज्या देशात तुमच्या सारखे निर्भय,स्वाभिमानी,निपक्ष शिक्षक असतील
तो देश महान आहे,मला याचा अभिमान आहे की, तुम्ही माझ्या संस्थेत शिक्षक आहात."
तो विद्यार्थी अंचभित झाला.हा काय प्रकार त्यास उमगेना.तो नुसता बघत राहिला.शिक्षकानेही
कृतज्ञता व्यक्त केली.त्या मुलाला जवळ घेतले आणि म्हणाले ," पुन्हा अशी चूक करु नकोस बाळा."
शिक्षक मंत्री महोदयास म्हणाले,"ज्या देशात तुमच्यासारखे नेते असतील तो देश किती महान होईल."
मंत्री,मुलगाआणि शिक्षक धन्य झाले.
माणसाची उंची विचारांवर अवलंबून असते.
शिक्षकांनी आणि नेत्यांनी आपले विचार उच्च
ठेवले पाहिजेत.
शिक्षकाचे वागणे दीर्घकाळ परिणाम करणारे असते.सर्व विद्यार्थ्यांना समानतेची वागणूक दिली गेली पाहिजे तेव्हाच शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य होईल.