चहा घेऊ! -ना.रा.खराद
अनेक पेय आहेत पण चहाची बरोबरी नाही.सर्वांच्या आवडीचेअसल्याने बदनाम नाही.दिवसाची सुरुवात या पेयाने होते.पाहुणे आले की चहा.चहा न पाजल्याचे आणि पाजण्याचे बरे वाईट परिणाम आपण बघतोच.अनेक नेते या चहातून घडतात.चहातून चाहते वाढतात.
चहा पीत गप्पा मारण्याचा एक वेगळाच आनंद असतो.एकाच वेळी दोन आनंद.चहामुळे दिवसाची सुरुवात गरम होते.चहा खिशाला देखील परडवतो.
चहामुळे तो भिकाला लागला असं कुणी म्हणत नाही.अनोळखी माणसाची ओळख चहाने होते.घरात वरिष्ठांसमोर चहा घेणे शक्य असते.अनेक माणसे झोपेतून चहासाठी उठतात.अनेकांना तोंड चहासाठी धूत असतात असे वाटते. चहा उकळतांना त्याचा एक वेगळाच दर्प असतो.तो उकळेपर्यंत देखील एक उत्सुकता असते.नित्य पिऊन देखील कंटाळवाणे वाटत नाही.पितांना घोट घोट रोमांचक असतो.
काही व्यक्ति मात्र आपण चहा पीत नाहीत असे अभिमानाने सांगतात.त्याची कारणेही न विचारता सांगतात.मी सकाळी एक कप चहा घेतो नंतर नाही,संयम वगैरे त्यांना सुचवायचे असते.इतरांकडून मिळाला तरच प्यायचा असाही काहींचा दंडक असतो.
ऊठसूट कुणालाही चहा पाजायचा नाही असे काही ठरवतात तर चहाशिवाय आम्ही कुणाला जावू देत नाही याचाही काहींना सार्थ अभिमान असतो.चहाचे दुष्परिणामही सांगितले जातात.आवडीपुढे त्याचे मोल नसते.
चहा तर राष्ट्रीय पेय बनले आहे.चहा पित गप्पा मारण्याचा
एक वेगळाच कैफ असतो.कपबशीचा आवाज कानी पडला की कसे हायसे वाटते.कुठे ग्लास,वाटीने , ताटामध्ये चहा पितात, कुठे बशीशिवाय चहा पितात.चहा पिण्याच्या पद्धती,वेग वेगळा असू शकतो.
जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला, कदाचित देवाला देखील चहा आवडत असेल.
चहा शिवाय तर पान हलत नाही.लाखो करोडोंचे व्यवहार असो की लग्न जुळवणे चहाशिवाय नाहीच.मान सन्मान
ठेवण्याचे चहा प्रतिक बनला आहे.उकळता चहा नाजूक ओठांवर अलगद विसावतो.पिण्याचा चटका असेल तर चटके देखील नांगी टाकतात.
चहा हे सर्वमान्य, सर्वश्रुत असे पेय आहे.जागोजागी ते
उपलब्ध आहे.हे पेय सर्व वयोगटातील लोकांना पचते.दात नसले तरी पिता येते.
चहा घरीदारी मिळतो.चहा नको, सहसा कुणी म्हणतं नाही.प्रत्येक भारतीय पेयवादी आहे.अमृताची गोडी तर
चांगली नाही परंतु चहाला मात्र अमृततुल्य चहा मानले जाते.