कळते आई लेकरांना
बाप कधी कळलाच नाही
दिसते अश्रू ढाळणारी आई
अश्रू लपवणारा बाप दिसलाच नाही
दिसते भाकरी थापणारी आई
पिठ आणणारा बाप दिसलाच नाही
दिसते आईची माया
बापाचे प्रेम दिसलेच नाही
दिसते घरात राबणारी आई
बाहेर राबणारा बाप दिसलाच नाही
दिसतो प्रेमातला धाक आईचा
बापाचे धाकातले प्रेम दिसलेच नाही
आईविना तिन्ही लोकांचा भिकारी असतो कुणी
बापाविना नसतो का कुणी
आई दुधावरची साय असते कुणासाठी
बाप नसतो का किमान दुध तरी
संस्कार दिसतात श्यामला आईचे
बापाचे आदर्श दिसत नाहीत
आईचा गोडवा गातात सारे
बापाचा का विसर पडतो
टोचला जरी काटा मुलांना
बाप टचकन रडतो
तरीही तो मुलांना का नडतो....!
- ना.रा.खराद