- ना.रा.खराद
जन्माबरोबर जे मिळतं ते नातं.
जन्मासोबत मिळतं ते आईचं रक्ताचं नातं.मग वडील, बहिण,भाऊ.आजोबा,आजी.चुलता,चुलती.चुलत भाऊ बहिण असा नात्याचा पसारा वाढत जातो.जन्माने मिळणारी नाती अनायास मिळतात.नव्याने मिळणारी नातीही असतात.
जीवनाचा बराचसा भाग हा नातेवाईक या
वर्तुळाभोवती फिरत रहातो.जग कितीही मोठे असले तरी जगण्याची जागा हिच असते.आई वडील,पत्नी,मुले इतर नातेवाईक हा गुंता फार मोठा असतो.
नात्यातील प्रेम, हेवेदावे ह्यातच जीवन संपून
जाते.रामायण, महाभारत असो की छत्रपती चे घराणे असो , नातेवाईकच सर्व खेळ करतात.जवळचे दूरचे , फायद्याचे नुकसानीचे हा विचार करूनच ते जोपासले किंवा तोडले जातात. मनोवृत्ती चा तो एक तमाशा असतो.चढाओढ, खेचाखेची त्याचे अविभाज्य अंग असते.राजकारणाची फोडणी त्याला असते.न
असूया ,ईर्ष्या हे बाळकडू असतं.
नात्यामुळे बरं वाईट वाट्याला येतं.बाप श्रीमंत असला की मुलांना आपसूकच ते धन येतं.कर्जबाजारी बाप असला की मुलांना ते फेडावे लागते.नात्यामुळे जसे अनेक फायदे होतात तसा विनाशही नातेवाईक करतात.
राजकारणी आपल्या नातेवाईकांना विविध
पदावर बसवतात.अनेक लायकीशून्य माणसे
नात्यामुळे मोठ्या पदावर असतात.
राजाची बायको रानी आणि मुलगा राजकुमार असतो.अमुक हा तमुकचा नातेवाईक आहे म्हणून त्यांचा रूबाब असतो.
काहीचे नाते सत्याशी, काहींचे देशाशीअसते.
काहींचे फक्त प्रियेसी. नाते पाहिजे तेवढे विस्तारता येते, संकुचित करता येते.विश्वची माझे घर मानणारे संत,घरच माझे विश्व मानणारे आपण.मैत्रीचे नाते हे ऐच्छिक आहे.मन जुळले की ते निर्माण होते.तिथे कुठलाही अडथळा नसतो.ते लादलेलं नसतं.तिथं मोकळीक असते.
जन्म नात्यामुळे होतो.जगावं नात्यासाठी
लागतं.मृत्युनंतरही नातेवाईक सोडत नाहीत.
आवडते,नावडते असतात नातेवाईक.माझं
अमूकशी पटत नाही.ते आणि आम्ही बोलत
नाहीत.आमचे वैर आहे.
जवळची माणसे दूर जातात.धनामुळे,मानामुळे.नात्याच्या गोत्यात अडकलेला माणूस ती जपण्यात, टिकवण्यातच आयुष्य काढतो किंवा ती संपवण्यात.स्वार्थ हाच नात्याचा आधार आहे.नात्यांमध्ये अनेकवेळा अबोला असतो.वैर असते.एकंदरीत नात्याभोवती मनुष्य गोता
काय रहातो.