शब्दांच्या वापराबाबत आपण खूप मोकळे आहोत, मोठमोठी विशेषणे लावण्यात पटाईत आहोत.
चार दोन लोकांचा मोर्चा ' विराट मोर्चा ' असतो.पानटपरीचे उद्घाटन ' भव्य उद्घाटन सोहळा ' असते.
गल्लीतील एखादे सम्मेलन ' अखिल भारतीय ' असते. एखाद्या छोट्या महाराजाला 'जगद्गुरू ' संबोधले जाते.
कुणी ' दानशूर ' तर कुणी ' ख्यातनाम ' असते.प्रत्येक सभा' विशाल ' तर रैली ' भव्य ' असते.
दामिनी, रणरागिणी तर कुणालाही संबोधले जाते.कुणी 'ढाण्या वाघ ' असतो,तर कुणी ' मुलुख मैदानी तोफ.
वेगवेगळे ' योगी ' वेगळे! ह.भ.प. तर गल्ली बोळात झाले.
'जगप्रसिद्ध ' तर वापरून जगप्रसिद्ध झाला आहे.ज्यास शेजारी ओळखत नाही,तो जगप्रसिद्ध!
अमूक माता, तमूक माता, अमूक रत्न, तमूक रत्न यांची तर खैरातच.कित्येक प्रकारचे व ठिकाणचे 'भूषण'.
बस असते ' रातराणी ' असते., मृत्यूरथ ' स्वर्गरथ' असतो.