संपूर्ण ब्रम्हांडामध्ये जिथे आपण विसावतो ते घर.
तो महाल असो वा झोपडी . घराला एक घरपण असते.
घराची ओढ असते.हक्काचं एक ठिकाण असतं.
वाट बघणारी माणसं घरात असतात.आहे ते वाटून खाणारी माणसे!
घरात बालपण गेलेले असते.घराचा प्रत्येक कोपरा बोलका असतो.घर एकटेपण वाटू
देत नाही.या विश्वाच्या पसाऱ्यात आपली
ती जागा असते.ऊन,वारा,पाऊस यापासून
आपणास निवारा देणारं घर असतं.
आजारी असतांना उशाला बसून धीर देणारी
माणसे घरात असतात.रडू कोसळले तर रडण्याचा कोपराही घरातच असतो.
वाडवडलाच्या पाऊलखुणा त्याच घरात असतात.तुळसीभोवती फेरा घालणारी
आई माझा संसार सुखाचा होऊ दे म्हणत असते,हे कळायला कान नाही तर ह्रदय लागते.
पाळलेलं मांजर घरामध्ये हक्कानं दूध मागतं ते घर असतं.
सासरी गेलेली मुलगी माहेरी परततांना घराकडे डोळे लावून बसते.घराचा उंबरठा
ओलांडताना तिला मंदिरात आल्यासारखं वाटतं.
सासर आणि माहेर मधला फरक तिला कळतो.
घरातले हास्यविनोद हे घर अजूनच फूलवतात.
रूसण्या फूगण्याची ती जागा असते.तु जेवला नाही तर मी जेवणार नाही,
हे फक्त घरातच ऐकायला मिळते.
आजी आजोबा असले म्हणजे माया काय असते कळते.
आपल्या वाट्याचा खावू नातवाला देवतांना आजीला समाधान लाभतं ते ठिकाण घर असतं.
मला नको लहान भावाला कपडे घ्या म्हणणारा भाऊ
ज्या घरात असतो ते घर असतं.
दिसतं नसऱ्या आजीची काठी धरणारा नातू
जिथं असतो ते घर असतं.
मुल आजारी असताना रात्री जागून काढणारी आई जिथे असते ते घर असतं.
ज्याच्या विश्वावर गाढ झोपावे असा बाप जिथं असतो ते घर असतं.