हास्ययात्रा

                                           हास्ययात्रा
                                                   - ना.रा.खराद

मनुष्य हा एकमेव हसणारा प्राणी आहे.तो हसतो आणि हसवतो . गालातल्या गालात हसण्यापासून तर खो खो
हसण्यापर्यंत त्याचा प्रवास आहे.न हसताही मनातल्या मनात हसणारेही हसूचोर असतात.तसे हसू अनेक कारणांमुळे येते . प्रसंगानुरूप हसू येते.कुणी विनोदी स्वभावाचे असते,मिस्किलपणा काहींच्या अंगी असतो.
निरागस बालके देखील हसतात.हसण्याची कारणे वेगळी असू शकतात.इतरांची फजिती बघून हसणारेही असतात.
कुठे काही थोडा आचरटपणा दिसला की हसू येते. सत्ता,शिक्षण, प्रतिष्ठा यामुळे काही माणसे खळखळून हसत नाहीत.
आपल्या सभोवताली अशा कित्येक घटना घडत असतात, ज्यातून हास्य फूलवू लागते.अचूक निरिक्षण,चपखल शब्द योजना यातून विनोद निर्मिती होते.विनोदी मनुष्य वातावरण खेळते ठेवतो.विनोदातून
बोललेले खुपत नाही.मोठमोठी सत्य विनोदाने बोलली जातात.विनोद हे एक अमोघ शस्त्र आहे.
विनोद ही एक वृत्ती आहे.विनोदी मनुष्य संकटात देखील हसतो.काहींचे अंगविक्षेप तर काहींची शब्दफेक विनोद निर्माण करते.
जे शब्दप्रभू असतात ते शाब्दिक कोट्या करतात.काहीअडाणी माणसे खुप विनोदी असतात.आपल्या खास
शैलीमुळे ते प्रसिद्ध असतात.चेष्टा,टिंगल, खिल्ली अशा कितीतरी स्वरूपात विनोद जोपासला जातो.
हास्य ही मानवाची ओळख आहे.किमान हसण्याच्या प्रसंगी तरी मोकळेपणाने हसले पाहिजे.जमले तर एखादा
विनोद करता आला पाहिजे.
चेहऱ्यावर उमटलेले हसू खुप काही सांगुन जाते.मित्र एकत्र जमले की गप्पा सुरू होतात.हास्याचे फव्वारे सुटतात.विनोदी माणसांचा सहवास हवाहवासा वाटतो.स्वतः वर विनोद केले जाऊ शकतात.विनोदाला पातळी
नसते,विनोद कितीही घसरु शकतो.अध्यापन करतांना रोज कित्येक विनोद घडतात किंवा
घडविले जातात .मुले त्यामुळे आनंदी, उत्साही राहतात.जीवनाकडे गंमतीने बघण्याचा दृष्टीकोन विकसित होतो.
सहकारी शिक्षकांसोबत सतत हास्य विनोद चालतो.खुप मजेशीर किस्से घडतात.त्यातील उदाहरणादाखल काही नमुने.
मी वर्गात अध्यापन करत होतो ,तिथे माझे बालवयातील शिक्षक मित्र आले आणि ते मुलांना म्हणाले ,"मी ना.रा.खराद ला हाप चड्डी घालत होते तेव्हापासून ओळखतो." सर्व मुले हसली. मी लगेच म्हणालो ,"मी तर 
त्याच्या अगोदर पासून सांगूळें सरला ओळखतो." मुले अगोदरच्या पेक्षा जोरजोराने हसू लागली.
एकदा जिगे महाराज मला म्हणाले," मी पण एक पुस्तक लिहिणार आहे." मी अनेक वेळा हे ऐकले होते ,न राहून
मी म्हणालो," लवकर लिहा नसता तुमच्यावर लिहिण्याची वेळ येईल." सगळे खदखदून हसले.
मी निरोप समारंभाच्या दिवशी सराव परीक्षेचे तपासलेले पेपर शाळेत आणले होते.एक एक विद्यार्थी येत असे आपला पेपर बघत असे आणि पुन्हा ठेवून देत असे.विजय जाधव सरांनी ते बघितले आणि मिस्किलपणे म्हणाले," तुम्ही पेपर अंत्यदर्शनासाठी ठेवलेत वाटते." मला हसू आवरेना.असे कितीतरी प्रसंग आहेत.विनोदामुळे जीवन समृद्ध
झाले आहे.ईश्वर प्रत्येकाला विनोद बुद्धी देवो.सगळी माणसे खळखळून हसोत.जिकडे तिकडे हास्य दिसो!🙏
      
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.