पैसा

                       पैसा
                              - ना.रा.खराद


पैसा हे विनिमयाचे साधन आहे.सर्वच देशात ते वेगवेगळ्या नावाने अस्तित्वात आहे.त्याची गरजही आहे.गरजेतूनच नवनिर्माण होते.काहींना गरजेपूरता पैसा कमावण्यासाठी धडपडावे लागते.बऱ्याच जनांकडे गरजेपूरता पैसा असतो.थोड्यांकडे अमाप पैसा असतो.पैशाची गरज असणारा वर्ग अमाप पैसेवाल्यांचा दास बनतो.जितका पैसा जास्त,तितकी माणसांची गरज पडते.माणसांना पैसा हवा असतो.
साधनाने मिळणारे सुख हे पैशाने मिळते.साधने पैशाने मिळतात.
पैशावरून माणसे लहान मोठी ठरू लागली.त्याच्याकडील संपत्ती हेच प्रमाण ठरू लागले.पैसा हि ताकद बनली.पैशामध्ये
उपद्रवमूल्य आहे.पैशाच्या बळावर माणसे
बोलू लागली.पैशाने काहीही करता येते ,असा विश्र्वास लोकांना वाटू लागला.पैशासाठी मनुष्य काहीही करू लागला.जिकडे तिकडे पैशाचे साम्राज्य!
ज्याला संधी मिळाली तो पैसा लूटू लागला.
सरकारी अधिकारी , नेते , व्यापारी गडगंज श्रीमंत झाले.नोकरदार मिळेल त्या पगारात 
ताळेबंद बसू लागला.त्याची एक पीढी खपते
तेव्हा दूसरी सुखाने जगते.साधनांची रेलचेल
झाली.त्यामुळे पैसा कमी पडू लागला.माणसे असमाधानी राहू लागली.मिळेल तसा पैसा कमावण्याची प्रवृत्ती वाढली. पैसे नसणारे पैसेवाल्याच्या  मागे फिरू लागली.त्याचा जयजयकार करूलागली.स्वार्थामुळे का होईना पैसेवाल्यांना मोठे म्हणू लागली.यातूनच ज्यांच्याकडे पैसा तो मोठा असे गरीब समजू लागले.पैशाला मिळणारा सन्मान बघून पैसा हेच सन्मानाचे
साधन बनले.पैसेवाल्यांचा अंहकार वाढला.
आमच्याकडे पैसा आहे,आम्हाला कुणाची गरज नाही,हा दर्प वाढला.एक वेगळा आविर्भाव पैसेवाल्यांमध्ये निर्माण झाला.
     गरीबांना, मध्यमवर्गीयांना हि जमात तूच्छ लेखू लागली यातूनच एक सामाजिक दूफळी तयार झाली.दोन सारखे भाऊ देखील एकमेकांना पैशात मोजू लागली.
     मी महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना खुप वाचन करायचो.माझ्या गरीबीची खिल्ली उडवताना एक जवळचा नातेवाईक म्हणे,याला ज्ञान झाले जास्त आणि पैसा पडला कमी.
पैशाअभावी फार अपमान सहन करावा लागतो.कित्येक जवळची माणसे पैसा नसला की जवळ थांबत नाहीत.पैसा असला तर दूरची जवळ येतात.
   रडणारे लहान मुल पैसा दिला की रडणं थांबवते.पैशाने न होणारी कामे होतात.
हे सर्व जरी खरे असले तरी पैसा हे सर्व काही नसते हेही लक्षात घ्यावयास हवे.
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.