वाला,वाली,वाले..

      ‌.   वाला,वाली,वाले..!
                                   ना.रा.खराद

    आपल्या दैनंदिन जीवनात दैनंदिन गरजा पूरविणारे किंवा आपल्या गरजेच्या नसलेल्या वस्तू विकत घेणारे जे असंख्य 'वाले' आहेत,ते वाखाणण्याजोगे आहेत.गरज जशी त्यांना आपली असते तशी आपणास देखील त्यांची गरज असते.
   आपल्या दिवसाची सुरुवात दूधवाल्यापासून
होते.चहा हा सूर्यमालेतील ग्रह वाटू लागला आहे.चहाशिवाय पान हलत नाही.भारतीय लोक चहा पिण्यासाठीच झोपेतून उठतात की
काय असे वाटू लागले आहे.अनेकांना झोपण्यापूर्वी दारु हवी असते.झोपेनंतर चहा. दोन्ही व्यसणं आहेत.असो.चहासाठी दूध हा घटक ,सरकार स्थापनेसाठी अपक्षांच्या पाठिंब्याइतकाच महत्त्वाचाआहे.सूर्योदयापूर्वी आपल्या दारावर कुणी येत असेल तर दूधवाला.हे दूधवाले वेगवेगळ्या रंगा ढंगाचे असतात. गल्लीमध्ये सकाळीच आढळणारे
हे मानवी प्राणी ,मोठे चिकाटीचे असतात.
लवकर उठण्याची सवय, पहाटेची थंड हवा आणि मिळणारे दोन पैसे यामुळे प्रसन्न असतात. आपला बाहेरच्या व्यक्तिशी पहिला
जो संवाद होतो तो या दूधवाल्यांशीच.
हल्ली सायकल ऐवजी मोटरसायकलवर ही
मंडळी आपला व्यवसाय उरकते.
दूधवाल्याची ओळख विसरता येत नाही.काही
दूधवाले वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी दूध पूरवितात , त्यांच्या दूधावर पोसलेले अनेक लोक असतात.दूधाचा गुणधर्म दूधवाले पण दाखवतात.दूधापाठोपाठ दूसरा जो 'वाला' असतो तो पेपरवाला.हा मानवी प्राणी अत्यंत चपळ असतो,तो बहुदा पोरसवदा असतो.पेपर वाटपाचे काम उरकून नंतर दूसराच काहीतरीउद्योग करणारा असतो.पेपर वाटणे यास अजुन उद्योग हा दर्जा प्राप्त झालेला नाही.हा वाला अत्यंत घाईत असतो.तो पेपर टाकतो,फेकतो , भिरकावतो गरजेप्रमाणे खाली ,वर फेकतो.हे कसब त्याच्याकडे सरावाने येते.तो फक्त बील घेतांनाच भेटतो.तीसरा जो वाला असतो ती बहुधा 'वाली' असते.कुणाची तरी घरवाली ती भाजीवाली असते.कदाचित भाजी हा शब्द स्त्रीलिंगी असल्याने तीची विक्री स्री करत असावी.
भाजीवाली म्हणजे एक कुतूहल असते.विविध मंजुळ आवाजात त्या भाजी विक्री करतात.
आवाजावरून भाजीवाली ओळखली जाते.
    एखाद्या प्रसिद्ध गायिकेप्रमाणे तीने आपली
ओळख निर्माण केलेली असते.संसाराचे ओझे
आपल्या डोक्यावर घेतलेल्या या स्त्रिया असतात.हा छोटासा व्यापार करुन आपला उदरनिर्वाह चालवत असतात.
      नंतर कचरेवाला येतो.जो नेहमी त्रासिक मुद्रा
घेऊन फिरत असतो.कचरा जमा करणे हे काम हसतमुखाने करणे तसे सोपे नसते.टाकणारा इतका घाण तोंड करतो तर त्याने का करु नये.रद्दीवाला ,हा टाकावू वस्तू जमा करणारा टिकाऊ इसम असतो.रद्दीमध्ये देखील जीवन शोधतो.रद्दीतल्या वस्तू कित्येक वेळा अमूल्यअसतात.जेमतेम किंमतीत तो मिळवतो.हजाराची वस्तू दोन पैशाला मागण्याची हिंमत फक्त तोच करु शकतो.उपयोग नसला की माणसाप्रमाणे वस्तू देखील रद्दी समजली जाते.भंगार हा शब्द नाहक बदनाम आहे. भंगारातून अनेकांनी आपले आयुष्य भंगार होण्यापासून वाचवलेआहे.
दिवसभर असे कितीतरी वाले भटकंती करतात.या वाल्यांचे आपण वाली असतो.जगण्यातील यामहत्त्वाच्या घटकांचा विसर पडू नये.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.