ज्याचे त्याचे घोडे

           ज्याचे त्याचे घोडे
                       - ना.रा.खराद


    आज समाजात सर्वत्र घौडदौड सुरू आहे.प्रत्येकाला पुढे जायचे आहे,यश आणि नाव कमवायचे आहे.सर्वच क्षेत्रात स्पर्धा बघायला मिळते.इतरांना मागे टाकून मी कसा पुढे जाईल हाच एकमेव विचार केला जात आहे.लहान सहान बाबतीत देखील कुरघोडी
बघायला मिळते.माझेच घोडे पुढे पाहिजे हा हव्यास खूप वाढला आहे.योग्य आयोग्य याचा सारासार विचार न करता ,आपले इच्छित साध्य करण्यासाठी कटकारस्थाने करण्यापर्यंत माणसांची मजल चालली आहे.
     इतरांचे हिसकावून घेतले की त्यांना असूरी आनंद मिळतो किंबहुना त्यास शौर्य किंवा चालाखी नाव दिले जाते.ही घौडदौड निवडणुकीत तिकिट मिळवण्यापासून तर बाजारात भाजी विकायला जागा मिळवण्यापर्यंत असते.बसमध्ये जागा मिळवण्यासाठी,नळावर पाणी भरतांना किती आटापिटा केला जातो.जिथे काही मिळते तिथे गर्दी,गर्दीतली धक्काबुक्की हे जसे आपल्या अंगवळणी पडले आहे.
     जो तो आपापल्या पात्रावर भात ओढतांना दिसतो आहे.हि जीवघेणी ओढाताण जीवनाचे अंग बनले आहे.
योग्यतेप्रमाणे दिले आणि मागितले जात नाही म्हणून हि स्पर्धा वाढली आहे.उताविळपणा, आततायीपणा ह्यामुळे विवेक हरवलेली माणसे सर्वत्र दिसत आहेत.जिंकणे म्हणजे जगणे अशीच व्याख्या जशी बनली आहे.तुझ्यासारखे इतरांना जगायचे आहे,त्यास हरवून जगायचे नाही.नको त्या स्पर्धा निर्माण करुन मल्ल तयार करायचे , माणसे कमी पडले म्हणून की काय प्राण्यांना
देखील शांत जगू द्यायचे नाही.त्यांचीही टक्कर किंवा शर्यत लावायची हा जीवनाचाअपव्यय आहे.पुढे जाणे म्हणजे इतरांना मागे टाकणे ही संकल्पनाच मुळात चूक आहे.त्यास खतपाणी घालण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत आहे.खेळाच्या देखील स्पर्धा अयोग्य आहेत.खेळाचा आनंद हवा,स्पर्धेचा नाही.माणसां माणसांमध्ये हे हारण्या जिंकण्याचे खूळ निश्र्चितच अनाठायी आहे.
   हि नसती उठाठेव आहे.आपली कुणाशीही कसलीच स्पर्धा असू नये ‌.इतरांना हरवण्याचा उन्माद आणि अंहकार ह्यातून निर्माण होतो.
लोकशाहीच्या नावाखाली माणसांमध्ये निर्माण झालेली दरी कधीच भरुन निघणार नाही.जिथे पक्ष आहे तिथे पक्षपात असणारच.जिथे पक्षपात तिथे न्याय कसा असणार.महत्वकांक्षा तिथे स्पर्धा,स्पर्धा म्हंटले
की डावपेच आखले जातात.
हे युग स्पर्धेचे आहे असे जे म्हटलं जातं ते सर्वथा चूकीचे आहे.कुणाशी आणि कशाशी स्पर्धा? जगण्याची कुठे स्पर्धा असते का?
   इतरांचे हिसकावण्याची मानसिकता कशी का
पटते.मी मिळवले ते माझे हवे.इतरांना मिळू
दिले नाही ,मी मिळवले हि पाशवी वृत्ती आहे.
जिंकण्यासाठी जसे आपण जगत आहोत, नसता आपण हारलेलो आहोत.मोठे युद्ध असो वा किरकोळ भांडणे जिंकण्यासाठी असते.या स्पर्धेमुळे अनेक विकार निर्माण झाले आहेत.आपसातील सौहार्द नष्ट झाले आहे.मानव अमानवीय बनला आहे.ध्येय, महत्त्वाकांक्षा मानवी शत्रु बनत आहेत.
आपले मोठेपण सिद्ध करण्यासाठी जे केले जाते ते लाच्छानास्पद व केविलवाणे तसेच किळसवाणे आहे.
         
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.