प्रेमाविषयी.... प्रेम हा सर्वांचा गरजेचा विषय आहे - ना.रा.खराद

प्रेमाविषयी.... - ना.रा.खराद


 प्रेम हा सर्वांचा गरजेचा विषय आहे. हे विश्व प्रेमाभोवती फिरते.
जीवनाचे मुख्य सार प्रेम आहे. कुणाचे तरी प्रेम लाभते म्हणून मनुष्य जगतो.
प्रेमाशिवाय जीवन रुक्ष,कंटाळवाणे होते. प्रेम संवेदनशील असते,हळुवार असते. प्रेमाचे अनेक रंग असतात. जन्मापासूनच प्रेमाची भूक असते. प्रेमामुळेच आईला पान्हा फुटतो.गाय नुकत्याच जन्मलेल्या वासराला चाटते.प्रेम शिकवावे लागत नसते. प्रेम व्यवहार नसते. लग्न व्यवहार आहे. सगळ्या गोष्टी ठरवून होतात. प्रेमात काही ठरलेले नसते. क्षणाच्या संपर्कात कधी प्रेम जडते तर पन्नास वर्षे सोबत राहूनही ते जूळत नाही.
आपल्यावर प्रेम असणारी अनेक माणसे असतात. लैगिंक संबंध म्हणजे प्रेम नव्हे. प्रेम कोणत्याही वयात होते, प्रेम कुणावरही असते. प्रेम अव्यक्तही राहते. सामाजिक बंधनामुळे प्रेमाची घुसमट होते. अनेकवेळा
प्रेम एकासी लग्न दूसऱ्यासी होते. कित्येकवेळा विवाहानंतरही अगोदरचे प्रेम विसरता येत नाही. विवाहानंतरही प्रेम जडते.
     प्रेमाला उपमा नाही. प्रेमात आणि युद्धात सगळे माफ असते. प्रेम मानसिक असते,हार्दिक असते. ते नष्ट करता येत नाही. एकाचे अनेकांविषयी किंवा अनेकांचे एका विषयी प्रेम असू शकते.नवरा बायको एकमेकांना ताब्यात ठेऊ पहातात. मोकळीक देत नाहीत.प्रेमाचे स्वातंत्र्य हे सगळ्यात मोठे स्वातंत्र्य आहे.
लहान मुल देखील आपले आवडते खेळणे जवळ घेऊन झोपते.ज्याचा सहवास हवा हवासा वाटतो ,असे जीवनात, मनात कुणीतरी असले की जीवन सुकर होते. पहिल्या नजरेतले प्रेम विसरता येत नाही. आवडलेली व्यक्ती कधीतरी भेटतेच.प्रेम कधीच म्हातारे होत नाही. कुणाचे प्रेम कुणावर आहे, सांगता येत नाही. उघड करतायेत नाही, ते लपून केले जाते. सर्व मानवजात लैगिंक संबंधातून निर्माण झालेली आहे. स्री
पुरुषांना एकमेकांचे आकर्षण असते,म्हणून काही बंधने आहेत. प्रेम देशावर असते. प्रेम प्राण्यावर असते. प्रेम मित्रांवर असते, मैत्रीणवर असते. गुरूवर असते, शिष्यांवर असते. संतानी जगाला प्रेम
अर्पावे म्हंटले.प्रेम वैश्विक असते. प्रेम मनात असते तेव्हा सर्वत्र असते. प्रेमाची नजरच कुछ और असते. नजरेने घायाळ करण्याचे सामर्थ्य प्रेमात असते. प्रेमाचा कुठला दिवस नसतो.ते अंखड,अनंत अनहद नाद असते.
प्रेम जगण्याची प्रेरणा असते.मनामनात ते वसलेले असते. ते गुढ असतं.प्रेमाच्या व्यक्ती ला भेटण्याची आतुरता असते. एका नजरेच्या सुखासाठी जीव वेडापिसा होतो.प्रेमातही कुरबुरी होतात. रुसवे फुगवे होतात.
त्याने प्रेम अजुनच घट्ट होते. प्रेमात मनुष्य आंधळा होतो.प्रेमवेडा होतो. प्रेम निखळ असते,निस्वार्थी असते.प्रेम दिल्याने मिळते.
    प्रेमात कदर असते, काळजी असते. ते आंतरिक असावे लागते.ते दिखावटी नसते. प्रेम मानसिक भूक असते. शारिरीक संबंधातूनही ते व्यक्त होते. प्रेम समर्पण असते. ते काही मागत नसते. ज्यास प्रेम लाभते तो इतर काही मागत नाही. प्रेमापुढे सगळे तुच्छ असते. तारुण्याचे आकर्षण हे प्रेम नसते तर प्रेमातून वाटणारे आकर्षण हे खरे प्रेम असते, परिपक्व असते. प्रेमाला वय नसते. ते कालातित असते. प्रेमाला नाते नसते, प्रेम हेच खरे नाते असते. प्रेम पिंजऱ्यात कैद करता येत नाही. डोळ्यात साठवता येते.
          
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.