अंदाज

                                           अंदाज
                                                        - ना.रा.खराद


आपले बहुतेक निर्णय अंदाज, अनुमान, भाकित यावर अवलंबून असतात.नंतर जे घडते ते घडते.काहींचे अंदाज
खरे ठरतात,अचूक असतात, तर्कशुद्ध असतात.कुणी सहजच एखादे भाकित करते.अंदाजे बोललेले कित्येकदा
खरे ठरते.काहींचे अंदाज मात्र कायमच चूकतात.परिस्थितीचे योग्य आकलन न होण्याचा तो परिपाक असतो.पूर्वानुमान लावणे ही गरज असते किंबहुना माणसाचा तो स्वभाव असतो.
रस्ता माहित नसतांना अंदाजे त्यावरून प्रवास करणे अनेकदा चूक ठरते.एखाद्या समारंभात इतके लोक येतील,इतका स्वयंपाक लागेल हा अंदाज असतो.एखादे
काम करण्यास इतका वेळ लागेल ,लग्न किंवा घर 🏡 इतका खर्च लागेल हा अनुमान बांधवा लागतो.
आज पावसाची शक्यता आहे ,असे समजून छत्री सोबत घेतली जाते.लहानपणीच मुलांबद्दल भाकित केले जाते.
निवडणुकीत कोण निवडून येईल याचा अंदाज वर्तविण्यात येतो.
अंदाजे लवचिक असते.पाच पन्नास लोक जमतील,शे दोनशे लोक होते,चार दोन दिवस थांबा हे असे बोलले
जाते.मला वाटलेच होते,आज तू भेटणार किंवा तुझे कधीच चांगले होणार नाही.आज गाडी उशिरा येणार
पासून मला इतके गुण मिळणार.विश्वकप अमूक पटकावणार.मुलगा होणार,मुलगी होणार असले अंदाज
लावले जातात.इतकेच नाही तर हे जग नष्ट होणार, युद्ध होणार.फळ पाडण्यासाठी दगड अंदाजे मारला जातो.नेम देखील अंदाज असतो.
भाजीमध्ये मीठ तिखट वगैरे अंदाजे टाकले जाते, काही विद्यार्थी आपणास किती मार्क्स मिळतील हे अंदाजे सांगतात.पाऊल टाकताना देखील जागेचा अंदाज घ्यावा लागतो.झाडावर घाव घालताना किंवा इतर अनेक कामे करताना अंदाज घ्यावाच लागतो.झाडावरचे फळ पाडताना.गोळी किंवा धनुष्य चालवताना अंदाज घ्यावा लागतो.उडी मारताना, अनेक खेळ खेळताना अंदाज घेणे गरजेचे असते.
अंदाज म्हणजे मनातल्या मनात लावलेले गणित असते,ज्याचे उत्तर मिळणार असते.अचूक अंदाज बांधता येणे यशस्वी होण्यासाठी आवश्यक असते.
अंदाज अपरिहार्य आहे.तो लावणे ही गरज असते.विचारपूर्वक पाऊल टाकले जाते.पाण्याचा अंदाज
न आल्याने कित्येक बूडाले आहेत, वाहून गेले आहेत.आपण इतक्या वाजता पोहचू हा अंदाज असतो.अमूक
ठिकाणी आपले काम होईल ,तमूक मनुष्य चांगला नसेल वगैरे अंदाजे बोलले जाते.
सर्व प्रकारच्या आशा अंदाज असतात.स्वप्ने अंदाज असतात.तर्क,शोध, अनुमान , भाकित अंदाज आहे.
ज्याचे अंदाज खरे ठरतात तो बुद्धीमान ठरतो, यशस्वी होतो.आपले अंदाज ही आपली ओळख असते.
          
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.