वाचन

                    वाचन
                          - ना.रा.खराद
ज्यास वाचता येते तो प्रत्येकजन काहीतरी वाचतोच.भले तो दुकानाच्या पाट्या वाचत असेल.हजारों वर्षांपासून लेखनकला आहे.अपार ग्रंथभांडार उपलब्ध आहे.आजही शेकडों लेखक आपली पुस्तके प्रकाशित करत आहेत.जगभरातील पुस्तकांचा अनुवाद होत आहे.चरित्र, आत्मचरित्र,कथा,कादंबऱ्या काव्यसंग्रह,नाटके पासून लसन खाण्याचे फायदे इथपर्यंत पुस्तके आहेत.जितक्या प्रकारचे लेखक त्याहून जास्त वाचकांचे प्रकार असतात.
सर्वच वाचक चोखंदळ नसतात.कित्येक फूकट मिळेल ते पुस्तक वाचतात.अनेक विशिष्ट पुस्तकेच वाचतात.फक्त धार्मिक किंवा फक्त अधार्मिक.काहींना वाचनवेड असते.झपाटल्यासारखे वाचतात.आयुष्यभर
वाचत असतात.पोथी वगैरे वाचणारे कित्येक
पारायणे करतात.पोथी वाचन त्यांच्यासाठी
भक्ति असते.
शिकणारी मुले क्रमिक पुस्तके वाचतात.कुणी
शेजारच्या घरुन आणलेल्या वर्तमानपत्राशिवाय काहीच वाचत नाही.
आवडीचा वाचनप्रकार असतो.आवडीचे पुस्तक किंवा लेखक असतो.काही व्यावसायिकांना वाचनाची गरज असते.काहींना काय वाचावे कळत नसते.तर कित्येकांना काय वाचले कळत नसते.डोक्यात काही पुस्तके बसत नाहीत, डोक्याच्या वरुन जातात.
वाचता येत असून देखील काहीच न वाचणारे
कशाचाही असतात.बैंकेचे पासबूक हिच त्यांची एकमेव पोथी असते.
कुणी फक्त शायरी किंवा जोक्स वाचतात आणि इतरांना ऐकवतात.काहींचे वाचन फक्त उपवासाच्या पोथ्या वाचनापलिकडे नसते.
बरेचजन फक्त प्रवासात वाचतात.कित्येक झोपण्यापूर्वी झोपण्यासाठी वाचतात.
थोडे वाचून फार विचार करणारे असतात.खुप वाचून थोडाही विचार न करणारेही असतात.उभे आयुष्य ग्रंथालयात घालवणारे असतात.तसे उभ्या आयुष्यात एकही पुस्तक न वाचणारेही.
मिळेल ते पुस्तक वाचणारे असतात.पाहिजे ते
मिळवून वाचतात.कुठे फूकट मिळाले तरच
वाचणारे असतात तसे विकत घेतल्याविना न
वाचणारेही असतात.वेळ घालविण्यासाठी कुणी वाचते तर वेळ काढून कुणी वाचते.
कुणाचे वाचन एस.टी.च्या पाट्या वाचनापुरते
असते.कुणी वाचाल तर वाचाल म्हणून वाचते.
कुणी कळत नसून वाचते ,कुणी कळेपर्यंत वाचते.
लिहिले जाते म्हणून वाचले जाते, त्यामुळे वाचण्याइतके महत्त्व लिहिण्याचा आहे.जो लिहितो किंवा वाचण्यासारखे लिहितो त्याची उपेक्षा करुन चालणार नाही,त्या लिहिण्यामागे किती तपश्चर्या आहे,तळमळ आहे, हे बघितले पाहिजे.आज जे काही थोडेफार बरं दिसते आहे,ते पुस्तकांमुळे.सर्व संतांनी लिखाण केले,ते का उगीच? समाज कल्याण, मानवी कल्याणासाठी त्यांनी आपली लेखणी झिजवली.लिहिलेले सर्वच साहित्य वाचनीय असते असे नाही.जडणघडण करणारी, प्रेरणादायी पुस्तके वाचली पाहिजेत.अनुभवातून लिहिलेल्या चार ओळी खुप उपयोगी असतात.उगीच कागदे काळी करणं म्हणजे लिखाण नव्हे.आपल्याकडे इतरांना वाटावे असे काही असेल तरच लिहायला पाहिजे.लिहिण्यापेक्षा लिहिलेले वाचले पाहिजे.अगोदर खुप वाचले की लिहावे की नाही कळते.अनेकांना वाचनाची आवड मूळीच नसते.अनेकांना फक्त वाचनाची आवड असते.काहींना काय वाचावे कळत नाही, काहींना काय वाचावे कळत नाही, काहींना दोन्ही!
आयुष्य हे फक्त वाचनासाठी नसते,निवडक साहित्य वाचण्यासाठी काही वेळ काढला पाहिजे, लगेच न वाचणेही चूकीचे ठरते.पुस्तके हा मानवाचा अमूल्य ठेवा आहे.तो जतन तर व्हावा.मानवी संस्कृती ही पुस्तक संस्कृती ठरावी.

                       
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.