आपले आयुष्य आवडते आणि नावडतेच्या चक्रव्यूह मध्ये सापडलेले असते."आपली आवड" हेच आपले जीवन असते तर नावड सारखी आपल्या मागे लागलेली असते.आपण सतत आवडीच्या शोधात असतो. आवडीनिवडीचे स्वातंत्र्य असते.आवडते तेच करत असतो.आवडते ते करण्यात जीवनाचा आनंद दडलेला असतो.रेडिओवर आवडीचे गाणे लागले तरी आनंद व्हायचा.घरामध्ये आवडीचा पदार्थ तयार केला की किती मजा येते.एखाद्या लग्न पंगतीत कितीही पदार्थ असले तरी ताव मात्र आवडीच्या पदार्थांवर मारला जातो.
प्रत्येक बाबतीत आपण आपल्या आवडीला
प्राधान्य देतो.आवडीच्या वस्तू,आवडीची ठिकाणे वगैरे.आवडीवरुनच आपण निवड करतो.गाजर निवडतांना देखील आवडते तसे गाजर आपण निवडतो.कपडे खरेदी करतांना आवडीचे दुकान निवडतो, दुकानात गेल्यावर आवडीचा रंग निवडतो.
ओळखीच्या लोकांना आपली आवड,नावड माहिती असते.प्रत्येकाला आवडी जपण्याचे स्वातंत्र्य असते.आवडीमध्ये खुप भिन्नता आढळते.आवडते ते लाभले की मनुष्य सुखी होतो.बसमध्ये आवडीचे सीट आपण हस्तगत करु पहातो.सिनेमागृहामध्ये किंवा सभेत आवडीची जागा आपण शोधतो.
आवडीच्या वस्तू आपण बाळगतो.काही वस्तूंची
आपणास विशेष आवड असते.ज्याला जे आवडते तसा तो जगतो,ज्याची त्याची आवड त्यावर कुठले निर्बंध नसतात.
पुस्तकांची आवड,आवडीची पुस्तके.आवडते
चित्रपट ,नट नट्या वगैरे.
साधनांप्रमाणे आवडीची माणसे असतात.नावडीच्या माणसांना टाळले जाते.
एखादी व्यक्ती आपणास खूप आवडते.कुणाच्या
तरी आपण आवडीचे असावे ही गोष्ट सुखावून जाते.आवडत्या व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटतो.आवडते गाणे नेहमी ओठांवर रहाते.
आवडीचा पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटते.
आवडीच्या स्थळांकडे मन धाव घेते.
कुणाचे विचार आवडतात, कुणाच्या भावना तर
कुणाचे सौंदर्य आवडते.जीवन म्हणजे आवडीची
गोळाबेरीज असते.आपण कुठेही असलो तरी आपली आवड आपण जपतोच!
आवडत्या मुलींशी लग्न केले जाते.आवडते काम
शोधले जाते.कुणाला काय आवडेल आणि कुणाला कोण आवडेल सांगता येत नाही.
आपली आवड हेच आपले जीवन असते.