स्वभाव

                   स्वभाव
    शरीराबरोबरच मनुष्य स्वभाव घेऊन जन्माला येतो.त्यामध्ये अनुवंशिकता असते.देश,काल, परिस्थिती असते.स्वभाव स्वाभाविक असतो.जसा आहे तो तसाच राहतो.हे स्वाभाविक वेगळेपण माणसाचे वैशिष्ट्य ठरते.त्याची ओळख बनते.
आपला स्वभाव आपणापेक्षा इतरांना जास्त कळत असतो.त्याचे विश्लेषण संपर्कातील लोकच करु शकतात.लोकनिंदा ती हिच.आपल्या विषयी पाठीमागे बोललं जातं ते बहुधा खरं असतं.लोक त्याच्याच समोर खरं बोलतात,जो खरं ऐकू शकतो.नसता उघड्या
डोळ्यांनी त्याचा विनाश बघतात.अधिकारी,गुंड, सत्ताधारी यांच्याविषयी स्वार्थ आणि भीतीमुळे कुणी खरे बोलत नाही म्हणून आम्ही करतो तेच खरे असे त्यांना वाटू लागते.
 स्वभावाचे अनेक पैलू आहेत.रागीट स्वभाव.अशा स्वभावाची माणसे रागाने बोलतात,रागराग करतात.लहान बाब असेल तरी पारा सौ डिग्री.
भाजीत मीठ जास्त पडले म्हणून बायकोचा खून करणारे.भारत कोणत्या खंडात आहे , हे न सांगू शकलेल्या मुलाला मरेपर्यंत मारणारे शिक्षक, एवढ्या तेवढ्या कारणाने आपल्या अपत्यास बदडून काढणारी आई.रागीट माणसे रागाच्या जोरावर सर्वकाही करु पहातात.वेळ ,काळ, परिस्थितीचे भान
राखले जात नाही.राग कमी जास्त प्रमाणात
सर्वांना असतो मात्र त्याची कारणे वेगळी असतात.काहींना खरं बोललं की राग येतो, काहींना खोटं बोललं ‌की.काही माणसे रागीट नसतात पण त्यांचा राग
इतरांना येतो.रागाने अनेक शुर निर्माण केले.रागाने अनेक अंहकारी विनाश पावले.
रागही चांगला वाईट असतो.त्याची कारणे
महत्त्वाची आहेत.अनेकजन राग व्यक्त करतात.काही दडवून ठेवतात.मनात साठवलेला राग भयंकर रुप धारण करतो.काहींच्या रागातही प्रेम असते.आपल्या मुलांवर रागवलेला बाप.विद्यार्थांवर रागावलेला विवेकी शिक्षक.मित्रावर रागावलेला मित्र.
रागावणे आपुलकीचे असावे, तिरस्काराचे नसावे.राग हा एक भाव आहे.राग कोण कशाकरिता करतो यावरून त्याचा दर्जा ठरतो.तो नेहमीचा उपयुक्त असतो असे नसले तरी प्रसंगी तो असावयास हवा.
आपला स्वभाव आपण ओळखला पाहिजे.तरच तो बदलता येतो किंवा धोके कमी होतात.स्लत:शी गाफिल
राहू नये.आपला स्वभाव कायम आपल्या सोबत असतो.स्वभावाला प्रसंगी मुरड घालावी लागते.आपला
स्वभाव झाकता येत नाही.जगासमोर तो असतो.जग स्वभावावरुन आपली ओळख निर्माण करतात.अगोदर
स्वभाव बघतात, त्यानुसार आपल्याशी वागतात.आपले
जे काही असते ते आपल्या स्वभावामुळेच.
स्वभाव ही आपली खरी ओळख असते, म्हणूनच आपण
आपला स्वभाव ओळखला पाहिजे.नसता लोक तुम्हाला
तो सांगतिल.
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.