का,कोण,कशाला?

का,कोण , कशाला...?
माणसाच्या विविध तऱ्हा असतात, तऱ्हेवाईक माणसे चर्चेत असतात.त्यांच्या
तऱ्हा इतरांसाठी कधी करमणूक तर कधी
डोकेदुखी ठरतात.काही केल्या ही माणसे
आपली तऱ्हा सोडत नाही, आणि इतरांच्या
कुचेष्टेचा बळी ठरतात.
सदोदित नकारात्मक भाषा व वर्तन करणारे
महाभाग मी बघितले आहेत. आक्षेप,शंका, विरोध त्यांच्या नसानसात भिनलेला असतो.
आपण जर म्हंटले," माझे ऐकून घ्या." तो म्हणणार ," का ऐकायचे?" 
आपण म्हणालो,“ तो अमूक." कोण तो?"
आपण,“ इकडे या." तो," कशाला तिकडे?"
तुसडेपणा आणि उध्ददपणाचे मिश्रण अशांच्या स्वभावात असते.
कुणी काही केले की ही मंडळी नकारात्मक
बोलणार म्हणजे बोलणारच! त्यांना फक्त
इतरांना चूक ठरवायचे असते,ते चूक नसले तरीही! अशा लोकांशी जुळवून घेणे मोठे
कसरतीचे असते.
कुठे मिरवणूक चालली तर, 'कशाला ढोल बडवता,कोणता किल्ला जिंकला तुम्ही?' 
वाढदिवसाचा कार्यक्रम असला कुठे,तर 
' जन्माला येऊन कोणता उपकार केला हो?'
सुंदर अशा बागेत घेऊन जा. 'कशाला आणले इथे?' आपण जर म्हंटले,' किती सुंदर फुले!' अहो म्हणून काय झाले,रोजच
फुलतात ती, त्यामध्ये काय एवढे नवल.'
कशालाच आणि कुणालाच चांगले म्हणायचे नाही असे या लोकांनी ठरवून टाकलेले असते.
तुम्ही यांच्यासमोर गेले की नकारात्मक कमेंट ऐकावीच लागते.कुणी हसत असले की," काय दात काढता,मूर्ख साले!'
गर्दीत गर्दीला नाव ठेवणार.एकांत असेल तर,काय स्मशानात असल्यासारखे वाटते'
असे बोलणार!
गरीबीचा मजाक उडवणार, श्रीमंतांनाही नाव ठेवणार.इतरांविषयी घृणेचे भाव कायम मनात भाव बाळगून असतात.
कुणाचाही मुलाहिजा, सन्मान न ठेवणे यामध्ये हे लोक धन्यता मानतात.हे महाशय लग्नात जेवले की स्वयंपाक चांगला नव्हता
अशी टिप्पणी करणाच.प्रत्येक पदार्थाला नाव ठेवल्याशिवाय त्यांना ते पचत नाही.
सतत नकारात्मक भाव एक मानसिक
रोग आहे.आपण तर त्याचे शिकार नव्हेत ना, एकदा तपासून पाहिले पाहिजे.निश्चित
आपल्यातील चांगला बदल हा आपल्या व
इतरांसाठी सुखावह असतो.
                     - ना.रा.खराद 
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.