Boss ला खुश ठेवण्याची कला ज्यास अवगत तो हुशार नोकर!

                                       Boss ला खुश ठेवण्याची कला !
                                                                               - ना.रा.खराद
तुम्ही सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी नोकरी करत असाल किंवा राजकारणात असाल आणि आपणास जर प्रगती किंवा प्रमोशन हवे असेल तर Boss  ला प्रसन्न ठेवण्याची कला अवगत असली पाहिजे, तुम्ही जर फक्त उत्कृष्ट कार्य करत रहाल,तर तुमचे इच्छित कधीच साध्य होऊ शकत नाही.
 Boss  ला प्रसन्न करुन घेणे सोपे नसते,कारण त्यांना कुणी काहीही चांगले केले,तरी ते आपल्या नावासाठी किंवा फायद्यासाठी करत आहे,असेच वाटत असते,कारण त्यांनी तसेच करुन प्रगती साधलेली असते.
कोणताही Boss  तुमच्या गुणांचा किंवा कार्याचा शोध घेत नसतो,उलट तो कामचुकार लोकाची पाठराखण करत असतो,कारण त्यास मिळणारा मानसन्मान त्यांच्याकडून असतो.
    कोणत्याही Boss  ला स्वाभिमानी कर्मचारी मूळीच प्रिय नसतो,कारणBoss  पणाचा एक दरारा असतो.तो स्वाभिमानी कर्मचारी त्यास भिक घालत नसतो.कामचूकार कर्मचारी, सामान्य बुद्धीमत्ता असलेले कर्मचारी त्यांना प्रिय असतात आणि सामान्य कर्मचाऱ्यांना Boss  प्रिय असतो.एकमेकांना सांभाळून घेत असतात.
 Boss  ला प्रसन्न ठेवण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात.आपल्याला लाभलेले कोणतेही यश हे त्यांच्या कृपेने, आशिर्वादाने, मार्गदर्शनाने लाभलेले आहे,असा उल्लेख केला पाहिजे.हे खरे नसले तरी,
वरिष्ठांना तसे बोलले पाहिजे.केलेल्या कामाचे कौतुक नाही झाले तरी चालते, परंतु न केलेल्या कामाचे
श्रेय भेटण्यासाठी Boss  असावे लागते.
अजून एक महत्वाचे, Boss  वाढदिवस कधीच विसरू नये, आपले कितीही महत्त्वाचे काम असो,
सर्वप्रथम त्यास शुभेच्छा द्याव्यात अर्थात घ्याव्यात कारण बऱ्याच देण्यामागे घेण्याचे कारस्थान दडलेले असते.दिसेल तिथे त्यांचे पाय धरावे,ह्यास कुणी लाचारी, हुजरेगिरी म्हंटले तरी त्याकडे दुर्लक्ष करावे, आपण आणि Boss ह्यास नम्रता म्हणून मिरवावे!
  Boss  चा कुणीतरी Boss  असतो,त्याची मर्जी सांभाळून तो वर पोहचलेला असतो, आपल्या Boss ला
आवडते तेच बोलता आले पाहिजे.आपला आशिर्वादाने सर्व ठीक आहे,असे खोटे परंतु रेटून बोलता आले पाहिजे, तसे ते खरेही असू शकते, कारण कामचुकार असून देखील त्याने त्याकडे दुर्लक्ष केलेले असते, सर्व खपवून घेतलेले असते.आपल्या Boss  मध्ये नसलेल्या गुणांची प्रशंसा करता आली पाहिजे,त्याच्या कोणत्याही निर्णयाला चूक ठरवू नये,उलट त्या निर्णयाचे स्वागत करावे.
डोक्यावर हात हवा असेल तर Boss  चे पाय धरा.
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.