अप्रिय मृत्युस,
तुझ्याबद्दल खुप ऐकूण आहे,
पण तुझ्याशी भेटण्याचा योग
अद्याप आलेला नाही,
पण तो कधीतरी येईलच
याची खात्री आहे.
तूला ओळखणे तसे सोपे नाही
तू कोणत्याही रुपाने येऊ शकतो
तूला कितीही टाळले तरी
तू एकदा अवश्य भेटतोच
तू कुणालाच नको आहे तरीही
तुझी सतत आठवण काढतात
तूला क्षणभरही विसरत नाहीत
एकदा तू भेटला की इतर
कुणालाही भेटता येत नाही
तू नकोसा असला तरी तुला मात्र
सर्व हवे असतात
तुला चूकविण्यासाठी अनेक
प्रयत्न केले जातात
परंतु तू प्रत्येकाला गाठतोच
तू प्रत्यक्ष दिसत नसला तरी
सर्व तुझी भिती बाळगतात
तू कधी मागे असतो
कधी पुढे वाट पहातो
कधी सोबतच असतो
पण दिसत नाहीस
कधी कधी तर झोपेतच गाठतो
पुन्हा उठू देत नाही
तूला काळवेळ नाही
तू हवे तेव्हा येतोस
कुठेही लपले तरी शोधतोस
तुला कुणीही आडवू शकत नाही
तूच सर्वांना आडवा करतोस
तू मरेपर्यंत आणि मरणानंतरही
सोबत असतोस
तरीही अप्रिय!
~ना.रा.खराद