गरज कधीही , कुणाचीही पडू शकते.

                       गरज
                               - ना.रा.खराद
आपल्या सतत कानी पडणारा शब्द आहे, गरज.इथे प्रत्येकास कशाची तरी गरज असते.जीवन म्हणजे आपली गरज भागविणे होय.गरज कुणाचीही कधीच संपत नाही.मनुष्य सारखा गरजांचा पाठलाग करत असतो.माणसे एकत्र येतात ते गरजेतून, एकत्र राहतात ते गरजेतून,खरेच माणसाला माणसांची खुप गरज असते.एकाच वेळ अनेकांची एक गरज असते,तर अनेकांच्या अनेक गरजा असतात.जगण्यासाठी गरजेपुरते जवळ असावे लागते.
कोणत्या वेळी कुणाची आणि कशाची गरज पडेल सांगता येत नाही, गरजेच्या वस्तू आणि गरजेची माणसे जवळ असावी लागतात.गरजेच्या वेळी उपयोगी पडलेली
माणसे विसरता येत नाहीत.गरजवंताला अक्कल नसते म्हणतात.गरज माणसाला कधी लाचार बनवते.गरज निर्माण होणे व ती पूर्ण करण्यासाठी धडपडत राहणं आयुष्य असते.
आपली स्वतःची व इतरांची गरज ओळखता आली पाहिजे.गरजेच्या वेळी उपयोगी पडतील अशी चार माणसे आपल्या सोबतीला असली पाहिजे.आपल्या गरजांचा क्रम लावला पाहिजे.कुवतीनुसार गरजा वाढवल्या किंवा कमी केल्या पाहिजेत.गरजेच्या वेळी उपयोगी पडलेली माणसे लक्षात ठेवणे गरजेचे असते.
गरजुंना सहकार्य करण्याची प्रवृत्ती हवी.मला कुणाची गरज नाही,हा दर्प मूळीच असू नये.जिथे सूईची गरज असते, तिथे दाभन चालत नाही.योग्य वेळी योग्य वस्तूंची
गरज असते.आपली गरज भागविणे हा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.आज जे गरजेचे आहे, उद्या ते गरजेचे असेल असे नाही आणि आज जे टाकाऊ वाटते कधीतरी त्याचीही गरज पडते.
गरज उद्भवू शकते, अशावेळी ती भागविण्यासाठी 
लागणारे मनुष्यबळ किंवा साधने उपलब्ध असावी लागतात.आपल्या गरजा आपणच भागवयाच्या असतात, परंतु इतरांची मदत देखील घ्यावी लागते.
गरज पडली की शोध सुरू होतो.कधी कशाची आणि कुणाची गरज भासेल सांगता येत नाही.गरजेपुरते बोलणारे असतात,तसे गरज नसताना तोंड घालणारे असतात.कष्टाची कामे ही गरज आहे म्हणून केली जातात.एकमेकांच्या गरजा भागविणे हा मनुष्य धर्म आहे.गरजेमुळे माणसाला महत्त्व असते,आपण जितके उपयोगी पडतो ,तितके गरजेचे असतो.प्रत्येक पाऊल टाकण्यासाठी जमीन गरजेची असते.प्राणवायुशिवाय तर क्षणभर जगता येत नाही.गरजेच्या वेळी झालेली मदत लाखमोलाची असते.कुठे वेळेवर पोहचणे गरजेचे असते,तर कुठे वेळेत काम पूर्ण करणे गरजेचे असते.गरजेइतके जवळ असावे लागते.कुठे प्रवासाला निघाले की गरजेचे सामान सोबत असावे लागते.
कोणत्याही कामाला सुरुवात करायची असेल तर त्यासाठी कशाची गरज आहे,हाविचार करावा लागतो.
गरजांचा डोंगर उभा असतो,तो सोडवण्यासाठी उभी हयात जाते.साधनांचा तुडवडा असेल तर गरजा भागत नाही.गरज भागली नाही,तर मनुष्य दुःखी होतो.गरजा
माणसाला स्वस्थ बसू देत नाहीत.गरज ओळखुन निर्णय घेण्याची क्षमता अंगी असली पाहिजे.गरज याविषयी जाणून घेणे गरजेचे आहे.
              
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.