वेगामुळे वेळ वाचते आणि वेळ अमूल्य आहे.

                      वेग
                            - ना.रा.खराद
वेग,स्पीड किंवा गती जीवनाचे एक अंग आहे,त्याची केव्हा गरज पडेल सांगता येत नाही, निसर्गाने पायामध्ये ती दिलेली आहे,वेग गरजेनुसार वाढवता किंवा कमी करता येतो.प्रत्येकाच्या ठिकाणी वेग वेगळा
असतो.ज्याची त्याची चालण्या, बोलणं तसेच खाण्यापिण्याची गती अथवा वेग असतो.
कुणी वेगाने लिहिते . वेगामुळे कामाचा उरक होतो.वेगामुळे वेळ वाचतो.एखादे काम घाईने करणे म्हणजे वेगाने करणे असते.वेळ पाळायची असेल तर वेग आळावा लागतो.वाहन वेगाने चालवणं कधी गरजेचे असते तर कधी चुकीचे असते.
बहुतेक अपघात वेगामुळेच होतात.अतीघाई काम वाया जाई, उगीच नाही म्हणत!
क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज असतात, ओलंपिक मध्ये वेगाने धावणारे धावपटू असतात.पळण्यासाठी वेग हवा असतो.बऱ्याच ठिकाणी वेग वाढत जातो.
जिथे वेळ कमी तिथे वेग वाढवला जातो.
वेगामुळे काम हातावेगळे होते.कुणी इतके वेगाने बोलते की शब्दांचे मिश्रण होते.पटपट, झटपट वेगाचीच भाषा.काही शारीरिक वेग किंवा आवेग असतात,ते थांबवता येत नाहीत, त्यांना मोकळी वाट करुन द्यावी लागते.काही प्राणी कायम वेगाने चालतात, त्यांच्या पायातच ती गती असते.वाहनांचा वेग ठराविक ठिकाणी नियंत्रित केला जातो.वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सूचना असतात किंवा दंड असतो.
रुग्णवाहिका, सैनिक, अग्निशमन दल यांना वेगाची गरज असते.तात्काळ हा वेगाचेच अंग असते.एखादा अनुचित प्रकार घडला किंवा घडू नये म्हणून पोलिसांना अत्यंत वेगाने घटनास्थळी पोहचावे लागते.वेळ कमी असेल तर वेग वाढवला जातो.
यंत्रामुळे खुप वेगाने कामे होऊ लागली.चाकातील गती जीवनाची गती बनली.कधी वेगामुळे जीव जातो,तर कधी वाचतो.कुणाची प्रगती वेगाने होते तर कुणाची अधोगती.वेग हा दोन्ही दिशेने असू
शकतो.पावसाच्या धारांना कमीजास्त वेग असतो.काही नद्या वेगाने वाहतात.जड वस्तू कमी वेगाने पुढे सरकतात.जीवन म्हणजे वेग.थांबला तो संपला.
काहींना वेगाचे वेड असते, अत्यंत घाईने काम करण्याची सवय असते.परंतु घाई म्हणजे वेग नव्हे.ठराविक वेळेत काम होईल,इतका वेग पुरेसा असतो.काम उरकून घेणे काहींचा स्वभाव असतो.
स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी हा वेग सर्व
जीवांना उपयोगी पडतो.पळ काढण्यासाठी पळावे लागते.कुणी पळकूटा म्हंटले तरीही! सरावाने कामाचा वेग वाढतो.वेग वाढता वाढता वाढतो.वेग नसेल तर वेळ वाया जातो.वेगाने निघून जाणे ,हा एक आवेग असतो.वेग नसेल तर विलंब होतो, खोळंबा होतो.उशिरा पोहोचले की खुप काही गमावलं जाते.
वेगाची आपली महती आहे, मर्यादा आहे.पायातला वेग कमीजास्त करावा लागतो, हे ज्यास साधले तो यशस्वी होतो.

Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.