- ना.रा.खराद
स्वच्छता फार गरजेची आहे.घाण तर आपण करतोच पण स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो.जिथे स्वच्छता तिथे थांबावे वाटते.स्वत:च्या शरीरापासून स्वच्छेतेची सुरुवात हवी.नंतर घर,परिसर, सार्वजनिक ठिकाणे याठिकाणे.शरीर हेच आपले साधन आहे.शरीर स्वच्छ असेल तर ते निरोगी रहाते.शरीर अनेक प्रकारचा मल बाहेर टाकते.त्यामुळे नियमित अंघोळ केलीच पाहिजे.स्वच्छतेअभावी शरीराची दुर्गंधी सुटेल आणि जवळ थांबणार देखील नाही.शरीराचा प्रत्येक अवयव स्वच्छ राखला पाहिजे.त्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे.
अगदी नखापासून स्वच्छतेची सुरुवात केली पाहिजे.अनेकांची नखे खुप वाढलेली असतात.त्यामध्ये घाण साचलेली असते.ती व्यवस्थित कापलेली नसतात आणि परिधान वगैरे थाटाचा असतो.
आपल्या नजरेला सहज पडणारी , विनामूल्य कापता येण्यासारखी तरीही वाढलेली ,घाणेरडी कशामुळे? नखातला मळ पोटात जातो ही साधी गोष्ट आपणास कळत नाही.हा तर गाफिलपणाचा कळसच असतो.ज्या नखांचा आपण वापर करतो. नखे वाढत रहातात.जूने कापले तरच तिथे नवीन दिसतील.अस्वच्छ नखांची माणसे 'स्वच्छता अभियान' राबवतात हे मोठे हास्यास्पद आहे.
दातांची स्वच्छता 😁 राखली पाहिजे.सर्वप्रथम नजरेस पडतात ते दात.आयुष्यभर चावण्याची गरज भागवण्यासाठी जे कार्य करतात.जिथे तिथे आपण दात
काढतो मग ते दात स्वच्छ ठेवणे आपले कर्तव्य आहे.
अन्न पदार्थांचे कण दातात बसल्याने त्यांची दुर्गंधी सूटते.
इतरांना ते किळसवाणे वाटते.केस काळे असणे जितके
गरजेचे वाटते तितकेच दात पांढरे असणे गरजेचे वाटले पाहिजे.जसे शितावरून भाताची परीक्षा होते ,तसेच दातावरुन भूताची होते.दाताबरोबर जिभेचीही स्वच्छता हवी.तंबाखू वगैरे सेवन केल्याने आरोग्य तर धोक्यात
येते परंतु दात,जीभ,ओठ यांचे सौंदर्य नष्ट होते.आपले शरीर व विविध अवयव हा आपला अमूल्य ठेवा आहे,त्याचा असा नायनाट करणे हे अशोभनीय आहे.
केसांची स्वच्छता राखली पाहिजे.घामाची ठिकाणी शोधूनती अधिक स्वच्छ केली पाहिजेत.नाक स्वच्छ ठेवले पाहिजे , रुमाल वापरला पाहिजे.ते आतून बाहेरून स्वच्छकेले पाहिजे.बाहेरुन घरी गेले की अगोदर हातपाय स्वच्छ धूतले पाहिजेत.आपण हे सर्व करतोच परंतु कुणी नसेल स्वच्छता बाळगत तर इतकी सुरुवात कराच.