सवयी चांगल्या असो की वाईट,गुलाम नको.

सवयी
आपल्यापैकी अनेकांना अनेक सवयी जडलेल्या असतात.इतर दोषांप्रमाणे मान्य न करण्याची देखील  आपणास सवय असते.
स्वत:च्या सवयी स्वत:ला कळत नाहीत,असे नाही पण आपले दोष शोधायला कुणाला आवडते? सवय एक प्रकारची यांत्रिकता आहे.मोठमोठ्या विद्वानांना देखील आपल्या सवयीविषयी माहिती नसते.सवय कळाली तर
ती रहात नाही.बहुतेक सवयी हास्यास्पद असतात.इतरांसाठी तो चेष्टेचा विषय ठरतो.
आपण नेहमी जे कार्य करतो , त्यामुळे काही
सवयी कायमच्या जडतात.कळून देखील त्या
दूर करता येत नाहीत.काही शारिरीक अंगविक्षेप सवयीचा भाग बनतात.नको तेव्हा नको त्या शब्दांचा वापर हा सवयीचा प्रकार असतो.एखाद्या शब्दांचा वारंवार उपयोग करण्याची कित्येकांना सवय असते.बऱ्याच जणांची वर्तणूक सवयीचा भाग असते.
लहान मुलांना अनेक वाईट सवयी असतात.आई वडील त्या दूर करण्याचा प्रयत्न करतात.
चांगल्याही सवयी वाईट असतात.सवय वाईटच ,कारण ती यांत्रिक आहे.शिकलेल्या पोपटासारखी त्याची गत असते.एखाद्या दूर्धर आजाराप्रमाणे ती जडते.सवयीचे गुलाम असणे कधीच चांगले नसते.शेकडों अशा  सवयीच्या विळख्यात आपण असतो, तरीही त्याची जाणीव आपणास नसणं हीच मोठी केविलवाणा गोष्ट आहे.
आपली प्रत्येक कृती जेव्हा जाणीवेतून होते,तेव्हा ती शहाणपणाची असते.केवळ सवयीचा भाग बनलेले आयुष्य म्हणजे यंत्रमानवच.सवयी नष्ट करण्याऐवजी आपण त्या जोपासतो,त्याचा अभिमान बाळगतो.
सवयी इतरांना त्रासदायक ठरतात.
आमच्याकडे जे अनेक पाहुणे आलेले आहेत,पैकी अनेकांच्या सवयी मी टिपलेल्या आहेत.कपबशीत चहा घेऊन आलो ,तर एक पाहुणा म्हणे," मला ग्लासमध्ये चहा पिण्याची सवय आहे." परत गेलो ग्लासमध्ये चहा घेऊन्आलो.दूसरा म्हणे,"लिंबू आहे का?,मला चहामध्ये लिंबू पिळण्याची सवय आहे." माझी मात्र या सवयींमुळे चांगलीच पिळवणूक होत होती.घरात लिंबू नव्हते.कुणाकडून तरी आणले.मला वाटले आता पटकन चहा घेतील,आपण मोकळे.परंतु नाही,त्यांनी चहा
थंड करायला ठेवला आणि म्हणाले,"मी चहा
थंड करुन पीतो." आता मी चांगलाच गरम झाला होतो.दूसऱ्या पाहुण्यांनी थंड झालेला
चहा मला परत गरम करायला सांगितला आणि ,"अजून एक कप चहा मागवा,मला दोन कप चहा पिण्याची सवय आहे." 
मनात म्हटलं," तुझी सवय तुझ्यापाशी,आज एकच कप पिल्याने काय मरणार आहे का हा." माझ्या सवयीप्रमाणे मी आतून चिडलेलो असतांनाही हसतमुखाने म्हणालो," हो हो खुप चांगली सवय,चहा आरोग्यासाठी खुप चांगला आहे." मला वाटले आता पाहुणे निघतील.एक म्हणाला,"मी घरी असलो की चहासोबत लगेच नाष्टा करत असतो." मी न ऐकल्यासारखे केले.कारण घरामध्ये नवरा हा राज्यमंत्र्यांसारखा असतो.सर्व अधिकार बायको नावाच्या गृहमंत्र्यांकडे असतात.
इकडे आड तिकडे विहीर ऐवजी इकडे पाहुणे
तिकडे बायको,अशी माझी कोंडी झाली होती.सौ ला भितच म्हणालो,"नाष्टा करते का?" तिच्या सवयीप्रमाणे तीने डोळे वटारले.
माझ्या सवयीप्रमाणे मी गप्प बसलो.
कुजबुज पाहुण्यांच्या कानापर्यंत पोहचली असे वाटले,कारण पाहुणे निघण्याच्या तयारीत होते." येतो आता,भेटू पुन्हा." मी हसतमुखाने म्हणालो,"या,स्वागत आहे नेहमीच." नाष्टा न मिळाल्याची खंत बाळगत
पाहुणे नजरेआड झाली.
                        ‌       
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.