असेही..तसेही...!

              असेही..तसेही...!
                                 - ना.रा.खराद
या जगात सर्व प्रकारचे लोक असतात.कुणी कसाही असू शकतो.आपण इतरांना हवे तसे नसतो,इतर आपणास हवे तसे नसतात.प्रत्येकाचा पिंड वेगळा असतो.माणसे परस्पर विरोधी प्रवृत्तीचे असतात.जगातले सारे बेबनाव,कलह याच कारणामुळे होतात.
विषम प्रवृत्ती संघर्षास कारण ठरते.
  आपला संपर्क ज्यांच्याशी येतो ते लोक नेमके
कसे आहेत,ह्यावर आपल्या जीवनाचे भाकीत
असते,गणित असते.कधीकधी एखाद्याचे आयुष्य एकाच कारणामुळे संपून जाते.एखादे भांडण देखील आयुष्यभर पुरते.एखादा आजार आयुष्यभर साथ सोडत नाही.
त्यामुळे जीवनाची व्याख्या करता येत नाही.ती प्रत्येकाची वेगळी असू शकते.
 जीवन सतत नवा अनुभव देते ,तिथे जूना अनुभव उपयोगी पडत नाही.इथे मारणारे मागे लागलेले असतात, तसे वाचवणारेही हजर असतात.इथे फेकणारे असतात तसे उचलणारेही.रडवणारे असतात तसे अश्रू पुसणारेही.साथ सोडणारे असतात तसे साथ
देणारेही.अपमान करणारे असतात, तसे मान देणारेही.शाप देणारे तसेच आशिर्वाद देणारेही असतात.निंदा करणारे तसेच स्तुति करणारेही.मागे खेचणारे तसे पुढे ढकलणारेही असतात.पायाखाली तुडवणारे तसेच डोक्यावर घेणारेही असतात.
आपण कसे आहोत , त्यानुसार जीवन आकार
घेते.संपर्क आणि संबंध कुणाशी येतो आणि तो आपण कसा हाताळतो यावर सर्व अवलंबून असते.शेवटी आपण असे आहोत की तसे आहोत त्यानुसार आपला शेवट होतो.
    
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.