हक्क

                                                  हक्क 
                                                                - ना.रा.खराद
 हक्क माणसाची मुलभूत गरज आहे.हक्क मिळालेले तर कधी मिळवलेले असतात.कधी हक्कासाठी भांडावे लागते तर कुठे मांडण्याचा हक्क असतो.वस्तू स्थावर असो वा जंगम कुणाच्या तरी हक्काच्या असतात.हक्काची जाणीव कुणाला असते तर कुणाला नसते, इतरांचे हक्क झूगारण्याचे प्रकार देखील होत असतात.कुठे हक्क डावलण्यात येतो.
  हक्क जसे कायद्याने असतात, तसे नीतीने असतात.काही हक्क समाजाने निश्चित केलेले असतात.लिखित कायदा नव्हता तेव्हाही हक्क होतेच.हक्काची जागा  जगण्यासाठी आवश्यक असते.नात्यांमध्ये किंवा मैत्रीच्या नात्यात हक्क असतो.कुणी बळाचा वापर करून हक्क निर्माण करतो.बसमध्ये रुमाल टाकून आपला हक्क सांगितला जातो.पूर्वी किंवा आताही शत्रूला पराभूत करून त्याच्या राज्यावर हक्क सांगितला जातो.
 हक्कासाठी अनेकांना संघर्ष करावा लागतो. कायद्याने हक्क प्राप्त होतो.नागरिक म्हणून आपणास अनेक प्रकारचे हक्क प्राप्त झालेले असतात.काही हक्क कायद्यानुसार चूक असले तरी समाजाने रुढ केलेले असतात.आपले हक्काचे घर असावे,असे प्रत्येकाला वाटते.हक्क डावलला की वाद ठरलेला असतो.वयानुसार काही हक्क प्राप्त झालेले असतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांचे हक्क असतात.
बरेच हक्क वारसाहक्काने प्राप्त होतात.काही ठिकाणी हक्क हिरावला जातो. हक्क प्राप्त होण्यासाठी काही प्रक्रिया हवी असते.सर्व प्रकारचे तिकटे किंवा परवाना हक्क प्राप्त करून देतात.आपल्या हक्कासाठी खुप माणसे सतर्क असतात.पूरावा दाखवून हक्क सांगितला आहे. काही व्यक्तीगत वापराच्या वस्तूवर कुणा एकाचा हक्क असतो.काही हक्क प्रेमाच्या नात्याने प्राप्त झालेले असतात.कुणी हक्क गाजवते,कुणी वापरते तर कुणाला हक्क समजत नाहीत.
 हक्क माणसाची मौलिक गरज आहे.नैसर्गिकरित्या त्यास खुप हक्क आहेत.ते अबाधित राखण्यासाठी तो प्रयत्नशील असतो.या जगात आपल्या हक्काचे काहीतरी असावे किंवा आपणास कशाचा तरी हक्क असावा असे वाटत असते.अनेक हक्क हे योग्यतेनुसार प्राप्त होतात.
   आपला कोणते हक्क आहेत आणि कोणते नाहीत हे कळले पाहिजे, प्रसंगी हक्कासाठी भांडता आले पाहिजे,आपला हक्क कुणी हिरावून घेत असेल तर त्यास विरोध करण्यासाठी सरसावले पाहिजे.
  
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.