धोका...धोका...धोका..!
माणसाने माणसाला धोका देण्याचे प्रमाण खूप जास्त होते आहे.प्रत्येकाने कुणाकडून तरी धोका खाल्लेला असतो, म्हणून तो देखील धोका देतो.कोण कधी कुठे कसा धोका देईल सांगता येत नाही.कुणावरही विश्वास ठेवावा असे आता दिवस राहिले नाही.धोक्याचे धक्के खातच आयुष्य पुढे सरकत जाते.
जशी रस्त्यावर धोकादायक वळणे असतात, तशी जीवन मार्गावर देखील धोकादायक वळणे असतात, तिथे सावधपणे मार्गक्रमण केले पाहिजे.दगा देणारी माणसे
ओळखून असले पाहिजे.
दिलेला शब्द न पाळणे,धोका देण्याचा मुख्य प्रकार आहे.खोटे आश्वासन देऊन ऐणवेळी हात वर करायचे आणि समोरच्या व्यक्तीला अडचणींत आणायचे किंवा बोलायचे एक करायचे दूसरेच.दिलेला शब्द फिरवणे धोका देण्याचा एक दूसरा प्रकार आहे.मी असे बोललोच नाही,मी विसरलो किंवा मला असे नव्हते म्हणायचे,असे विविध नखरे केले जातात आणि धोका दिला जातो.
खोटी माहिती देणे ,धोका देण्याचा प्रकार आहे.
आपला माल विकावा म्हणून त्या मालाबद्दल खोटी माहिती दिली जाते.पुढे अनुभव येतात तेव्हा ते लक्षात येते. उधार किंवा उसने घेतलेले परत न करणे हा धोका आहे.आपल्यावर विश्वास ठेऊन ज्याने आपली अडचण सोडवली त्याचे पैसे परत न करणे त्याच्याशी धोका आहे.
धोक्याची पातळी ओलांडली की जसा धोका खुप वाढतो.धोका खाणं आणि धोका देणं जसं मानवी जीवन बनत चालले आहे.
व्यवहारात धोक्याचे प्रकार खूप बघायला मिळतात.
व्यवहार चतुर व्यक्तीच फक्त यामधून सुटतो , इतर माणसे व्यवहारात फसतात.त्यांना फसवले जाते.
प्रेमप्रकरणात तर किती धोके आहेत.कोणत्या वळणावर धोका मिळेल सांगता येत नाही.माणसाची नियत कधी फिरेल ओळखता येत नाही.नियतीचा खेळ म्हणून त्याकडे बघावे लागते.
धोका केवळ माणसांपासूनच असतो असे नाही, अनेक ठिकाणे किंवा वस्तू धोकादायक असतात.विश्वसनीय असे या जगात काहीच नाही, त्यामुळे सावध असणे चांगले.
तोंडघशी पाडणे , धोका देण्याचा प्रकार असतो.अचानक अडचणीत आणण्यासाठी त्यास गाफिल ठेवून ऐणवेळी घणाघात करणे या प्रकारात मोडते.
धोके देणाराचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असतात.आपल्या जवळपासची धोके देणारी माणसे ओळखता आली पाहिजे, अनोळखी व्यक्तीशी सावधपणे वागले पाहिजे.एकदम पूर्ण विश्वास टाकणे धोक्याचे ठरू शकते.धोका कुणीही देऊ शकतो, शक्यता बाळगून असावे.कुणावरही फार विसंबून राहू नये.
आपण धोका खाल्लेला असला तरी आपण
कुणालाही धोका देऊ नये, म्हणजे जीवन सुखकर होईल.आपले आणि इतरांचेही.