बाजू आपल्या समोर असते.आपण एकच बाजू बघतो किंवा एकच दिसते.तराजूचे जसे दोन्ही पारडे समान असल्याविना योग्य वजन होत नाही तसेच माणसांच्या दोन्ही बाजू बघितल्याशिवाय त्याचे योग्य मूल्यमापन होत
नाही.एक बाजू कधी मुद्दाम झाकोळली जाते तर एक बाजू मुद्दामच उघडी केली जाते.
अनेक नामवंत किंवा यशस्वी लोकांचे जेव्हा पितळ उघडे पडते, तेव्हा सत्य अवगत होते.सत्याचे ज्ञान होण्यासाठी दूसरी बाजू तपासणे गरजेचे असते.चमकते ते सर्व सोनेच असते असे नाही, फक्त आपल्या डोळ्यांवर धूळ नसावी. कोणताही न्याय एक बाजू बघून केला जाऊ शकत नाही,त्यासाठी दोहोंची बाजू ऐकून घेणे गरजेचे असते.
न्यायालयात देखील दोन्ही बाजू समोर असाव्या लागतात.एकतर्फी निर्णय हा अन्यायच असतो.कधीकधी समोर चकाकणारे मागच्या बाजूने खुप काळे असते.
दिसणारी बाजू बहुदा फसवी असते. गोरा रंग बघून कित्येक लोक फसलले असतात.गोड बोलण्यामुळे माणसे चांगली समजली जातात.एखाद्याच्या एखाद्या वाईट गोष्टीचा इतका गाजावाजा होतो की त्याची चांगली बाजू झाकोळली जाते.अनेक चांगल्या समजल्या गेलेल्या लोकांची काळी बाजू समोर येते तेव्हा लोकांना आश्चर्य वाटते.
एखाद्याकडे एखादा गुण आहे म्हणून तो गुणगान आहे असे नसते.एखाद्या दूर्गुंणाने तो दूर्गुणी ठरत नाही.परीक्षेमध्ये जसे सरासरी गुण बघितले जातात तसेच माणसाचेही मूल्यमापन व्हावयास हवे.आपणास कृति दिसते परंतु त्यामागील प्रेरणा किंवा उद्देश दिसत नाही.वरुन चांगले दिसणारे सफरचंद आतून सडके
निघते.टरबूज तर कापल्याविना कळत नाही.
पाय दाबणारे, गळ्यापर्यंत कधी पोहोचतील
सांगता येत नाही.सेवा करणारे कसा मेवा मागतात हे आपण बघतोच. दूसरी बाजू तपासल्यानंतरच आपले मत बनवले पाहिजे.
अभिप्राय किंवा प्रतिक्रिया तात्काळ देऊ नये.
सगळे धोके दूसरी बाजू न तपासल्याने मिळतात.दिसते तेच किंवा तितकेच खरे,हे खरे नसते.किंबहुना ते खोटेच असू शकते.
दूसरी बाजू उपेक्षित ठेवल्याने आपणास माणसे ओळखत नाही.हे न ओळखता येणे अविवेकी आहे आणि अविवेकीपणा काय असतो हे सर्वांना ठाऊकच आहे.