महिला दिनाच्या निमित्ताने.....

           महिला दिनाच्या निमित्ताने.....

  लिंगभेदाचे विद्रुप उदाहरण म्हणजे स्री पुरुष.
एकमेकांपासून निर्मिती असलेले हे जीव एकमेकांशी स्पर्धा केल्यासारखे वागत आहेत.
 आज महिलांच्या बाजूने शेंकडों कायदे आहेत.
चूक कुणाची असो ,कायम पुरुषांना दोषी मानले
जाते.एक बाप म्हणून,भाऊ म्हणून पुरुष चांगला
असतो ,तो फक्त पुरुष म्हणून चांगला नसतो.आज समाजात विविध चळवळी उभ्याआहेत.सर्व राजकीय पक्ष देखील महिला अध्यक्ष वगैरे असे स्वतंत्र गट स्थापन करतात.मूळात महिला हा काही वेगळा प्रकार आहे का? सरसकट माणूस म्हणून जगता येत नाही का? स्री आणि पुरुषांमध्ये अंतर पडण्याचे हेच कारण आहे की दोहोंचा वेगळा विचार केला जातो.स्रियांबद्दल कायम अतिरंजित गोष्टी लिहिल्या गेल्या.रामायण, महाभारत त्यांच्या मुळे घडले असेही लोक बोलतात.सासु सुनेची भांडणे, जावा जावा ची भांडणे ही तर सर्वश्रुत आहेत.स्री स्त्रीचा विरोध करत नाही का?
  मुलगा हवा असे स्त्रियांना वाटत नाही का?
मी पुरुष किंवा स्त्री असा विचार न करता दोहोंचा विचार करतो.प्रत्येक घरात जसे दोन्ही वास्तव्य करतात तसं ते समाजात घडले पाहिजे.
 एकीकडे समानतेची मागणी करायची आणि दुसरीकडे आपण महिला असल्याचे ठासून सांगायचे.महिलांसाठी राखीव हा प्रकारच मला योग्य वाटत नाही.बसमध्ये पुरुष बसलेला आणि महिला उभी असेल तर पुरुष तिला जागा देतो स्वतः उभा रहातो.परंतु एखादी महिला उभी असेल तर दूसरी महिला तीला जागा देईलच असे नाही.महिला महिलांच्या वेदना समजून घेतात का? राजकारणी लोकांनी जेवढे गट पाडता येतील तितके पाडले कारण राजकारण हे एकीवर नाही तर दूहीवर अवलंबून असते.
प्रत्येकाची आई महिला असते.आईचे सन्मानाने
ग्रंथ भरले आहेत.जसा प्रत्येक पुरुष सत्यवान
नसतो तसे प्रत्येक स्री सावित्री नसते.पुरुषांप्रमाणे सर्व गुण दुर्गूंण स्रियांची ठिकाणीही असतात.फक्त ती स्री आहे म्हणून ती निर्दोष आहे असे मानने एकांगी आहे.
अन्याय हा अन्यायच असतो.तो कुणाकडून झाला हे महत्त्वाचे नसते.
 महिलांना वेगळी किंमत, दर्जा,महत्व देऊन एक वेगळा गट तयार करणे योग्य नाही.महिला म्हणजे पुरुषविरोधी 
असा समज तयार करून दुफळी माजली जाते.
  महिलांच्या बद्दल चांगला दृष्टीकोन ठेवा असे
म्हणतात.पण पुरुषांबद्दलचा महिलांचा दृष्टीकोन
कसा असतो हे सर्वांना ठाऊक आहे.सर्व पुरुष
सारखेच असेच महिलांना वाटते आणि हे जर
खरे असेल तर मग काय? आणि खरे नसेल तर
मग ही कुचंबणा का? आज प्रत्येक. ठिकाणी
महिलांना प्राधान्य दिले जाते.पुरुष स्वतः पुढाकार घेतो.तिथेही त्यांच्या हेतूवर शंका घेतली जाते.समाजामध्ये वाईट प्रवृत्तीची माणसे
असतात.त्यांचा त्रास केवळ महिलांना नाही तर
प्रत्येक घटकांना होतो.त्रास देणारा एक असेल
तर मदत करणारे शेकडो असतात.राखी बांधणारा भाऊ पुरुष असतो.नाते विश्वासाचे असते.
विश्वमंचावरुन ,'बंधु आणि भगिनींनो' संबोधणारे
विवेकानंद.भारताचे प्रतिनिधी आहेत.एखाद्या
अप्रिय घटनेने संपूर्ण पुरुषांना कटघरात उभे
करणे असंस्कृत आहे.जोपर्यंत महिलांना वेगळे
मानले जाईल तोपर्यंत तीचे वेगळेपण तीला वेगळे ठेवेल.ती फक्त मानव आहे आणि सर्व प्रकारच्या अत्याचारापासून तीस मुक्ती हवी आहे.स्वातंत्र्य हवे आहे.समान दर्जा हवा आहे.तो तर असलाच पाहिजे.महिलांना पुरुषांचा विरोधी न मानता हे एकच जीव आहेत.नाहक भेदभाव करुन विधात्याचा अपमान करु नये. पटले तर बघा नसता सोडून द्या.
      
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.