Body language
- ना.रा.खराद
भाषा हे संवादाचे अमोघ साधन आहे हे खरे, परंतु भाषा नव्हती तेव्हा आणि असून देखील अंगविक्षेप आवश्यक व तितकेच महत्त्वाचे आहेत.भाषेच्या माध्यमातून खोटे बोलता येते, परंतु अंग खोटे बोलत नाही.आपला प्रत्येक अवयव एक जिवंत भाषा आहे.आवाजातील कंपन देखील शारिरीक भाषा आहे.आपल्या सर्व प्रकारच्या हालचालीतून आपण व्यक्त होत असतो.'जीने के लिए सिर्फ इशारा काफी है।' बोलने निरर्थक असू शकते परंतु अंगविक्षेप कधीच निरर्थक नसतात.शरीर आपली भाषा व्यक्त करते.सर्व मुके प्राणी न
बोलता आपल्या पेक्षा चांगला संवाद करतात,कारण त्यांना एकमेकांची शारिरीक भाषा समजते.अबोल राहून सर्व काही करता येते, काही न करता बोलत राहणे योग्य नसते.
सिनेमा,नाटक वगैरे अंगविक्षेपाची उदाहरणे होत.डोळ्यांमधील बदलते भाव एक शारिरीक भाषा आहे.हात ,हाताची बोटे,पाय,पायाची बोटे आपली शारीरिक भाषा म्हणजे body language बोलत असतात.अगदी सहजपणे उद्गारलेले दोन शब्द दिलासा देऊन जातात,त्याचे कारण त्या शब्दामागचा भाव.जसा शब्दात भाव असतो, तसे भावात शब्द असतो.
शारिरीक भाव हिच शारिरीक भाषा आहे.ती शरीराची प्रतिक्रिया आहे.हसणे रडणे शारिरीक भाषा आहे,ती भावना आहे.मोठे भाषण जे व्यक्त करु शकत नाही, ते डोळ्यातील दोन अश्रू बोलून जातात.
शरीराच्या आपल्या गरजा आहेत,त्या पूर्ण झाल्या किंवा नाही झाल्या दोन्ही अवस्थेत शरीर त्याची प्रतिक्रिया देते, म्हणून डाक्टर आजारी माणसाचे डोळे,जीभ वगैरे चेक करतात.पेशेंटला विचारत नाही.आपल्या शरीराची एक स्वयंभू भाषा आहे.मुक्याला देखील आपण समजावून घेऊ शकतो, मूकपणे समजावून सांगू शकतो.डोळ्यांचा बदलणारा आकार, पापण्यांची हालचाल, भुवयांच्या हालचाली खुप काही सांगुन जातात.
वेगवेगळे हातवारे, आवाजातील कंपने,बसणे, उभे राहणे यावरून खुप काही समजते.
दात,ओठ,मिशा,दाढी हे अवयव आपली भाषा व्यक्त करत असतात.मनुष्य नकळत याच शारीरिक भाषेतून व्यक्त होत असतो.
छाती ,पोट,कंबर काही सांगून जातात.
खाजणे,नखे कुरतडणे, अंगठ्याने जमीन खोदणे,हात चोळणे,हात दाबणे, अंगावर काटा उभा राहणे शारिरीक भाषा आहे.खाली बघणं,वर बघणं किंवा तिरपे बघणं यावरून मनातील भावना व्यक्त होतात.भूकेला, तहानलेला, आसुसलेला, आपल्या शारीरिक भाषेतून व्यक्त होतो.
भाषेपेक्षा शारिरीक भाषा समृद्ध आहे, परंतु ती भाषा समजून घेण्यासाठी तितकेच समृद्ध असावे लागते.