अबब!

                   अबब!
                                   - ना.रा.खराद

  मी एके दिवशी असं ठरवलं की आपण स्री पुरुष असा मूळीच भेदभाव करायचा नाही.आपण पुरुष आहोत हे विसरायचं आणि समोरची स्री आहे हे विसरायचं, परंतु मला हे खूप महाग पडले आणि आता मी पुरुष असल्याचे क्षणोक्षणी लक्षात ठेवतो आहे.
   मी रोज हजारों पुरुषांना ' गुड मॉर्निंग ' गुड नाईट ' असे मेसेज टाकतो आणि ते पुरुष मला प्रतिउत्तर देतात,आज मी सर्व स्त्रियांना ' गुड मॉर्निंग ' असा मेसेज टाकला आणि मोठे वादळ उठले.मला वाटले सर्वांना छान वाटेल, परंतु झाले वेगळेच, अनेक पुरुषांनी माझा नं चेक केला, कित्येक स्त्रियांनी मला ब्लाक केले.सर्व स्त्रियांनी मला वाईट माणूस समजले.कुणी धमकी दिली, कुणी शिव्या दिल्या, कुणी फोन लावून विचारणा केली.पहिलाच अनुभव इतका वाईट आला की पुढे हिंमत होत नव्हती ,पण अनुभव घ्यायचा होता,कारण स्री पुरुष समानता आम्हाला शाळेत शिकवली गेली, परंतु मुलींकडे बघितले तरी मास्तर मारायचे हा भाग वेगळा!
   मी बसने प्रवास करायला निघालो, माझ्या शेजारी एक सीट रिकामी होती,एक बाई उभी होती,मी म्हणालो,बसा! त्या बाईने माझ्याकडे घृणास्पद नजरेने बघितले,मला कळेना मी काय गुन्हा केला, पुरुष असल्याची जाणीव परत एकदा झाली.नंतर एक पुरुष आला आणि दणकण माझ्या शेजारी येऊन बसला.
  आता तर वाटले नको हा प्रयोग.परंतू अनुभव घ्यायचा होता.एक सुंदर बाई दिसली,मी तीस म्हणालो,' तुम्ही खुप सुंदर आहात.' तीने माझ्या गालावर सुंदर अशी रांगोळी काढली.
 आता तर मी खूप घाबरलो होतो.विचार केला सत्य शोधले पाहिजे.मी शर्टचे बटन उघडे केले आणि छाती आणि पाठ मी लोकांना दाखवू लागलो.लोक मला हसू लागली,वेडा, मूर्ख, फालतू समजू लागली , परंतु काही झाले तरी मी 
स्री पुरुष भेदभाव करणार नव्हतो.
मला ड्रेस घ्यायचा होता,बायकोला सोबत घेऊन गेलो, अनेक दुकानांमध्ये गेलो, अनेक ड्रेस बघितले आणि पसंत नाही म्हणून परत आलो, बायको पार चिडली.'थोबाड पहा आरशात!' ड्रेस पसंत नाही म्हणे.यापूर्वी शेकडो वेळा हा त्रास मला झाला आहे,आज तसं वागून पहावं म्हटलं इतकेच!
एक ओळखीची बाई अचानक कोसळली ,जवळ कुणी नव्हते,मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो,तिचा नवरा नंतर तिथं आला,तो मला बोलला नाही, मी काही तरी गुन्हा केला असा तो बघत होता, मला वाटलं ती बाई तरी म्हणेल , तुमच्यामुळे वाचले.माझ्याकडे तिने बघितले पण नाही, तेव्हा कळले, मी पुर्ण आहे म्हणून!
  एकदा मी पत्नी समवेत कारने प्रवास करत होतो,एक बाई डोक्यावर ओझे जे न झेपणारे होते, गाडीमध्ये जागा होती,मी थांबलो,ती स्त्री खूप घाबरली, काहीसं न बोलता निघून गेली.
  असे अनेक अनुभव आहेत.
  पुरुषांबद्दल स्त्रियांचा दृष्टीकोन चूक आहे की स्त्रियांबद्दल पुरुषांचा , हे समजून घेणे गरजेचे आहे.स्री पुरुष हा भेदभाव खूप घातक आहे.
  वरील उदाहरणे केवळ स्त्री पुरुष एकमेकांपासून कसे सावध आहेत, पूर्वग्रहदूषित आहेत आणि खरंच स्री पुरुष समानता आहे का, यासाठी हा लेख! आपणही विचार करावा,आपले अनुभव सांगावेत, चर्चा घडवून आणावी व स्री पुरुष समानता कशी आणता येईल यासाठीचे उपाय सूचवावेत, जेणेकरून दोन्ही मोकळा श्वास घेऊ शकतील!
   

   

Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.