- करमणूक
करमणुक ही मानवाची गरज आहे.करमणूकीची विविध साधणे मानवांनी निर्माण केली आहेत.
नैसर्गिक साधनांचा देखील करमणूकीसाठी उपयोग केला जातो.आयुष्याचा इतका मोठा काळ करमणूकीविना कंठणे अशक्य असते.करमणूकीचा विरोध करणारे लोक देखील कोणती तरी करमणूक
करत असतात परंतु त्यांच्या ते लक्षात येत नाही.
करमणूकीची कित्येक साधणे फार अघोरी असतात.प्रत्येकजन कोणत्यातरी करमणूकीत गुंतलेला असतो.कित्येकवेळा लोक ज्यास कर्तव्य किंवा साधना वगैरे असे गंभीर शब्द वापरतात प्रत्यक्षात ती त्याची करमणूकच असते.कोणताही व्यक्ति कोणतेही कार्य त्यामध्ये मन रमल्याशिवाय
करु शकत नसतो.हे मन रमते म्हणजेच करमणूक होय.इतरांसाठी ते काम असते परंतु त्याच्या स्वत:साठी ती करमणूकच असते.
मनोरंजन हे कोणत्याही प्रकारचे असू शकते.ज्यामुळे मनाची करमणूक होते,मन सुखावते
असे कोणतेही कार्य अथवा अवस्था मनोरंजन होय.एखाद्या अधिकाराच्या खुर्चिवर माणसे तासनतास
बसतात ते कार्यनिष्ठेमुळे नाही तर त्यांचे मन सुखावते.पोलिस ज्यावेळी अंगावर वर्दी चढवून लोकांसमोर येतो ,त्यावेळी त्यास अभिमान होतो त्याचे मन सुखावते म्हणजेच त्याचे मनोरंजन होते.
नेते मंडळी प्रत्येक लग्नाला हजेरी लावतात ती यामुळे नाही की त्यास संबंधित माणसाबद्दल खूप
प्रेम आहे ,खरे कारण असते लोकांमध्ये गेल्यानंतर लोक बघतात,चर्चा करतात, त्यामुळे त्यांचे मानसिक रितेपण दूर होते,त्यांचे मनोरंजन होते.
माणसे इकडे तिकडे फिरतात, बघतात.इकडतिकडचे बोलतात हे अकारण नाही
तर ते मनोरंजन ,करमणूक असते. रस्त्यावर विविध खेळ करणारे लोक आणि ते बघणारे बघे दोहोंचीही करमणूक होत असते.
करमणूकीचे क्षेत्र अफाट आहे.आवडीचे काम केल्याने करमणूक होते म्हणून ते जीव ओतून केले
जाते .लोकही म्हणतात,"मला कामाशिवाय करमत नाही." काम ही देखील करमणूक असते.तसे नसते
तर ते कुणीच केले नसते.
गायक गाणे गातो कारण त्यास त्याची आवड असते,त्यास गाण्याचा मोबदलाही मिळतो.गाणे
लोकांसाठी काम असले तरी त्याच्यासाठी करमणूक असते.मनुष्य रिकामा बसू शकत नाही.
त्यास काहीतरी केल्याविना आराम नाही.म्हातारी माणसे आणि लहान मुले यांना काहीच करु दिले जात नाही, त्यामुळे ते कंटाळून जातात.नातवाला सांभाळले तरी त्यांना बरे वाटते, हे बरे वाटणे म्हणजे करमणूक होय.लहान मुल गुपचुप बसत नाही ,त्यास देखील करमणूक हवी असते.विविध प्रकारच्या खेळणी करमणूकीची साधने तर आहेत.
जिथे माणसाचे मन रमते तिथे मनुष्य सुखावतो मग ती जागा कोणतीही असो.मंदिरात भजन गाणारे
असो की तमाशाच्या फडात बसलेले लोक असो,ज्याची त्याची साधने वेगळी असतात.
आंदोलने, भांडणे,विरोध, निंदा देखील करमणूकीसाठी होते.निंदेचे एक वेगळे सुख असते
नसता कोण उगीच तासनतास ती करेल. भांडणात देखील करमणूक होते.भांडखोर माणसे
आपल्या करमणूकीसाठी त्याचा उपयोग करतात.
कवी,लेखक वगैरे आपल्या करमणूकीसाठी लिहितात,त्याने इतरांचीही करमणूक होते .जो इतरांची करमणूक करतो त्यास पैसा आणि प्रतिष्ठा मिळतो.हास्याचा उदगम हा करमणूकीच्या गरजेतून
झाला.विदूषक असो वा सोंगाड्या आपली करमणूक करतात.स्वत:ची करमणूक जो करतो
तो कलाकार होय.इतरांची करमणूक केली की पैसामिळतो.अभिनयाने करमणूक करणारे लाखों रुपये
कमावतात.फडात नाचणाऱ्या बाईला दूसरे काय मिळत नाही असे नसते परंतु तीची करमणूक ज्यामध्ये आहे, त्यामध्ये ती रमते आणि पैसाही मिळतो.पोट भरण्यासाठी इतरांची करमणूक ,भरले
की स्वत:ची करमणूक होते.जीवन करमणूकीसाठी आहे.मोठमोठी युद्धे करमणूकीसाठी असतात.
लग्नात उडवले जाणारे पैसे हे केवळ करमणूकीसाठी असतात.प्रतिष्ठा ही देखील एक प्रकारची करमणुकच आहे.माणसे रिकामी दिसत नाहीत याचा अर्थ ती फार उद्योगी आहेत असे नाही
तर ती त्यांची गरज असते.करमणुक ही माणसाची सर्वांत मोठी गरज आहे.वेळ न कळणे,हा वेळ घालवण्याचा उत्तम मार्ग आहे.मित्रांसोबत खुप वेळ गप्पा मारणे सर्वांना आवडते.महाविद्यालयातील मुले मुली तिथे रमलेली असतात,जगाचा विसर त्यांना पडतो.विसर पडणे म्हणजेच करमणूक.कशात तरी रमल्याशिवाय जीवन कंठत नाही.
कुतुहल,जिज्ञासा ही देखील करमणूकच आहे . शास्त्रज्ञ संशोधन करतात , त्यांना जिज्ञासा असते
त्यांची करमणूक होते.एकासाठी जे काम ते इतरांसाठी करमणूक असते तर काहीवेळा एकासाठी जी करमणूक इतरांसाठी ते काम असते.
सहवासातले सुख ही देखील करमणूक आहे.मला अमूक ठिकाणी करमते याचा अर्थ तोच.
कुणी फार अभ्यास करते म्हणजे काहीतरी नकोसे करत नाही,त्याचा तो विरुंगुळा असतो.सर्व छंद करमणूकच करतात.बेधूंद होऊन नृत्य करणे काय किंवा तबला वाजवणे काय ही करमणूक आहे.
लहान मुलांसोबत खेळणे करमणूक होते.परंतु तेच मुल सांभाळायला सांगितले तर नकोसे वाटते.मनुष्य स्वत:च्या इच्छेने जे करतो त्याने त्याची करमणूक होते.आकाशाकडे टक लावणे
ही देखील करमणूक ठरते. करमणूकीचा हा पसारा फार मोठा आहे.तुर्तास एवढेच!