ज्याचे वजन नाही, परंतु महत्व अनन्यसाधारण आहे असा तो कागद!या
कागदांमुळे प्रचुर असे ग्रंथभांडार आपणासमोर खुले आहे.सर्व महत्त्वाचे 'कागदपत्रे' असतात.सर्व वर्तमानपत्र कागदांवर छापली जातात.रद्दी कागदे पुन्हा वापरात येतात.या कागदांचे किती उपयोग आपणास ठाऊक आहेतच.
मोठमोठ्या वाटाघाटी, आर्थिक व्यवहार या कागदपत्रांच्या आधारे होतात.मालमत्तेपेक्षा त्या कागदांना जपले जाते.न्यायलयाचे निवाडे कागदाच्या आधारे होतात.आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या दोन ओळी जीवनमरणाचा प्रश्न बनतात.
पूर्वी जो पत्रव्यवहार होत असे,तो कागदावरच.पुस्तकातून पाठवलेली कागदी
चिठ्ठी प्रेम जुळवत असे.वैद्य पेशंटला कागदावर औषधी लिहून देतो.बस कंडक्टर
तिकिट म्हणून हातावर कागद टेकवतो.
सर्व सर्टिफिकेट म्हणजे कागदच.फ्रेम करुन घरात सजवले जातात.लग्नपत्रिका देखील कागदच, परंतु किती प्रतिष्ठेची.
लहान मूले कागदाची होडी बनवतात.कुणी कागदावर तर कुणी कागदापासून चित्र बनवतात.कागदी फुले तर खुप खपतात.
कागदाने आडोसा केला जातो.हवा घेतली जाते,नाक पुसले जाते.
सजावटीसाठी कागदांचा वापर होतो.चित्रपटांची मोठमोठी पोस्टर कागदी असतात .मुलांची पुस्तके, वह्या कागदच.
भारतीय चलन देखील कागदी आहे.कागद जाळण्यासाठी उपयोगी पडतात.लवकर पेट
घेणारा कागद,पेटवितो देखील.अनेक वाद
या कागदामुळे उद्भवतात तर अनेक शमतात.
महत्वाची कागदे जपून ठेवली जातात.कुणी रद्दी मधून कागद शोधतात.
कागदांचे विविध रंग, आकार असतात.हवा
तसा कागद मिळतो.एकाच कागदांचे अनेक
उपयोग असतात.सर्व सरकारी कार्यालयात कागदांचा कारभार असतो.सावकार जमीनीची वगैरे गहाणखत जवळ बाळगतो.
माणसांचा कागदांवर अगाध विश्वास आहे.
कागदी पुरावा सबळ मानला जातो.
कागदापासून पतंग ,पताके बनवतात जे किती उंच भरारी घेतात.उंच उडायचे असेल
तर स्वतः ला हलके ठेवावे लागते हे कागदापासून शिकता येते.
एक कागद अनेक ठिकाणी प्रवास करतो, अनेकांना स्पर्श करतो.त्याची जपवणूक होते म्हणून तो टिकतो.जपले तर काहीही टिकते हे कागद शिकवतो.कागदांचे आपणावर अनंत उपकार आहेत.
कागदांचा हा अगाध महिमा आपणासमोर मांडला आहे.आपण देखील कागदावर दोन
ओळी लिहा.