साड्यांचे घर

                    साड्यांचे घर
                                   - ना.रा.खराद


      बायको साडीसाठी रुसून बसली होती.नुकतीच कुठल्यातरी सणानिमित्त तीने साडी खरेदी केली होती.घरामध्ये साड्यांचा सडा पडलेला असतांना तीने कुठल्यातरी लग्नाला जायचे म्हणून साडी खरेदी करण्याचा हट्ट धरला होता,स्री हट्टापुढे हात टेकले जातात.पुन्हा,"मेलं साडी तर मागितली,अक्खं दुकान नाही." एका साडीसाठी शहरातील सर्व दुकाना पायाखाली घातल्या व त्या सर्व दुकानातील साड्या नजरेखाली घातल्या तेव्हा एक साडी कशीबशी पसंत पडली.
    अगोदरचे एक कपाट क्षमतेने पूर्ण भरले होते तरी साड्यांचा अतिरिक्त भार सहन करत होते.बायकोने लगेच ,एक कपाट घेऊया.' असे आर्जव केले.नकार देण्याइतपत हिंमत कुठल्याच नवऱ्यात नसते 'असे अखिल भारतीय स्त्रिया ओळखून असतात.
  आमचे घर हे आता' मिनी साडी सेंटर' वाटू लागले होते.
साड्यांचे पोत आणि प्रकार व किंमत सर्व काही बायकोच्या तोंडपाठ! तीचे साड्यांबद्दलचे अफाट ज्ञान
बघून वैषम्य वाटते.
    स्त्रियांचे आयुष्य साड्यांभोवती गुंडाळलेले असते.कपाट दोन कपाट साड्या घरात असतांना , एक धडाची साडी नाही.असे म्हणण्याचे धाडस स्त्रियांकडेच असते.साड्यांमध्ये देखील उपप्रकार पडतात."आलेल्या साड्या" "गेलेल्या साड्या" वगैरे!
    जूनी भांडी देऊन तीने साड्या खरेदी केल्या व नंतर त्याच साड्या देऊन भांडी खरेदी केली."
बायकांना कायम दूसऱ्या बाईची साडी सुंदर वाटते , अजून एक साडी खरेदी करण्याचा तो डाव असतो.
साड्यांमध्ये "माहेरची साडी" सर्वांत प्रिय असते व सर्वात तुच्छ नवरोबानी आणलेली साडी असते.
स्वतः च नेसलेली साडी , स्वतः च आरशासमोर उभे राहून बघण्याचे जे सुख आहे ते कशातच नाही.पुन्हा नवऱ्याला विचारले जाते ,"मी या साडीमध्ये कशी दिसते?" अर्थात उत्तर हे ठरलेले असते.मनामध्ये मात्र चार शिव्या त्याने हासाडलेल्या असतात.
  बायको साडी खरेदी करतांना नवरोबाचे पडलेले चेहरे हे कशाचे द्योतक आहे हे सर्वश्रुत आहे.साड्यांचा पडलेला खच , तरीही ती वर बघते.चोरुन सोबत आणलेली घरातील एक साडी मी त्या ढिगारात मिसळून दिली,अखेच तीच साडी तीने पसंत केली.
साडी सोडून इतर विषय तुच्छ!
   साड्यांची देवानघेवाण देखील मोठ्या प्रमाणात होत असते.अनेक साड्या प्रवास करुन मूळ ठिकाणी परत येतात.काही निवडक साड्या असतात.विशेष प्रसंगी त्या
बाहेर पडतात.एखाद्या ठिकाणी जातांना साडी व्यवस्थापन इतके जोरदार असते की आपण बघायला
चाललो की दाखवायला तेच कळत नाही.
कधीही न फाटणारी लग्नातील साडी.ती एखादी ऐतिहासिक वस्तूप्रमाणे सांभाळून ठेवली जाते.
    बाल्यावस्थेत ' आईची नाटी'असायची.त्या नाटीत सगळा संसार गुंडाळलेला असायचा.ती रापलेली, राबलेली नाटी आमच्यासाठी पवित्र असायची.त्याच नाटीच्या पदरावर आई झोपू घालायची.त्याच नाटीने डोळे पुसायची.वारे घालायची.काही खायला बांधून आणायची.ते आठवले की बायको आणि आईमधला फरक कळू लागतो.
                 

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.