संग्रह

संग्रह 

मानवामध्ये तसेच काही अंशी प्राण्यांमध्ये, पक्षांमध्ये देखील संग्रह वृत्ती असते.बालवयातच 
तुच्छ वस्तू जमा करण्याचा छंद जडतो.शंख शिंपले,गोट्या अशा कितीतरी वस्तूंचा संग्रह केला जातो.संग्रह एक प्रकारचे संचित असते.जे
आपण जमवले त्यावर आपण मालकी हक्क
प्रस्थापित करतो.थोडे थोडे जमा करण्याची प्रवृत्ती सर्वत्र बघायला मिळते.गरजेतून संग्रह वृत्ती वाढते.उद्याची तजविज हा त्यामागचा उद्देश
असतो.संग्रह बचत नावानेही ओळखला जातो.
मातीचा ढीग देखील कणांचा संग्रह असतो.पाई पाणी जमा करुन अनेकजण कोट्याधीश झाले आहेत.ज्ञान असो वा धन कणाकणाने मिळवावे
लागते.
घरामध्ये अनेक वस्तूंचा संग्रह असतो.चित्रकार आपल्या चित्रांचा,कवी कवितांचा संग्रह करतो.
विखुरलेले एका ठिकाणी साठवणे ,त्याची जपवणूक करणे संग्रह आहे.अनेक फोटोंचा संग्रह अल्बम नावाने ओळखला जातो.
कित्येक ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह असतो.प्रसिद्ध व्यक्तीच्या वापरलेल्या वस्तू किंवा निवास संग्रहालय म्हणून ख्याती पावते.
जिथे तिथे ,जो तो संग्रह करत आहे.वाचक पुस्तके जमा करतात,ग्रंथ संग्रह करतात.धान्याची कोठारी धान्य संग्रहासाठी असतात. काहींना संग्रहाचे विलक्षण वेड असते.कोण कशाचा संग्रह करेल सांगता येत नाही.जूनी नाणी जमवण्याचा काहींना छंद असतो.व्यापारी मालाची साठवणूक करतात.
स्त्रिया साड्यांचा संग्रह करतात.जमवणे, साठवणे हा संग्रहच आहे.मनुष्य हा संग्रहशील
प्राणी आहे.डोक्यावरचे केस देखील केसांचा संग्रह आहे.कुणी दागिने जमवतो.
प्राणी संग्रहालये असतात,तिथे विविध प्राण्यांचा
संग्रह असतो.गायकांचे अल्बम त्यांच्या गाण्यांचा
संग्रह असतो.काही संग्रह छंद असतात.काही
करमणूक तर काही गरजेचे असतात.
धनसंचय मोठ्या प्रमाणात केला जातो.साधन
म्हणून पैसा उपयोगी पडतो.दगडगोटे देखील
जमवण्याची कित्येकांना आवड असते.
संग्रह प्रवृत्ती ही फार प्रबळ प्रवृत्ती आहे.गरजेपेक्षा कितीतरी मानवाला हवे असते किंबहुना गरज कधीच संपत नाही,माणुस संपतो.
           
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.