- ना.रा.खराद
नोकरीच्या अनेक जाहिरातींमध्ये ,'अनुभव पाहिजे.'अशी अट असते.दुकानाच्या पाटीवर ,"अनुभव हिच खात्री."
अशी आर्जव असते.आयुष्यभर सातत्याने मिळणारी एकच गोष्ट म्हणजेच अनुभव.
वयोवृद्ध माणसे अनुभवामुळे मार्गदर्शक ठरतात."उगीच पांढरे नाही झाले.". हा ताठाही उगीच नसतो.अनुभव केवळ एखाद्या कामाचा नसतो.मनुष्य जितका
उचापतीखोर तितका अनुभवी असतो.
एकाच गोष्टीचाखुप अनुभव असणे वेगळे आणि अनेक गोष्टींचा थोडाअनुभव असणे वेगळे.
प्रत्येक गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतनसतो.इतरांच्याअनुभवांचा अनुभव घ्यावयाचा असतो.ज्ञानचक्षुने तोघ्यावयाचा असतो.पोहता येत नसेल तर मनुष्य पाण्यात बुडतो,हे प्रत्यक्ष बघायचे नसते.हत्ती वजनदार असतो,हेउचलून बघायची गरज नसते.मनुष्य मरतो हे अनुभवाविना आपण मान्य केलेले असते.
ज्या क्षेत्रात आपण काम करतो तिथला आपणास अनुभव असतो.मनुष्य अनुभवाची देवाणघेवाण करतो.मनुष्य शिकतो म्हणजेच अनुभव घेतो.
अनुभवाचा एक वारसा असतो.काही अनुभव हे मोजक्या लोकांना
येतात. बरेच अनुभव सर्व सामान्य असतात.काही असामान्य असतात.आपले अनुभव इतरांना सांगावेसेवाटतात.मागील अनुभवाची शिदोरी घेऊनच पुढील
आयुष्य कंठायचे असते.आपले जे ज्ञान आहे,ते अनुभवआहे,त्याच्या आधारे आपण मार्गक्रमण करत असतो.
अनुभवाविना बोलणे बडबड समजली जाते.
जितके कार्यक्षेत्र मोठे, तितके अनुभव जास्त.संकटातअनुभव जास्त येतात.
अडचणी आणि दु:ख माणसालाबरेच काही शिकवून जाते.जे शिकवून जाते त्यास अनुभव म्हणतात.
संपर्कात येणाऱ्या माणसांचाही आपणास अनुभव असतो.माणसाला ओळखून असणे म्हणजे त्याचा अनुभव असणे.अनुभवाने कार्यकुशलता वाढते.नुसतेवय वाढणे म्हणजे अनुभव नव्हे.प्रत्यक्ष इतरांच्या ठिकाणी स्वत:ला बघून अनुभव घेता आला पाहिजे.
संवेदनशील मन जास्त अनुभव घेते.इतरांच्या भाव भावना ओळखता येणे खरा अनुभव आहे.कवी,लेखकांकडे ही प्रतिभा असते.
अनुभव सर्वा़चे सारखेच असतात,असे नव्हे.एकाच व्यक्तिबद्दल अनेकांची मते भिन्न असण्याचे तेच कारणआहे.अनुभव घेण्याचाही एक दृष्टिकोन आपण बाळगूनअसतो.कळलेले वळल्याशिवाय अनुभव येत नाही.प्रत्येकवेळीप्रत्येक गोष्टीचा एकसारखा अनुभव येत नसतो,तो प्रत्येक वेळी नवाही असू शकतो.
अनुभव कधी जूना ताकतीचाअसतो कधी नवा.अनुभव एकमेकांना काटत असतात.
मी पाहिले,मी ऐकले असे बोलले जाते.पहिला अनुभवरोमांचित करणारा असतो.प्रथमच समुह बघितला की काय अवस्था होते.समुद्र किनारी रहाणारास तसेहोत नाही.सायकल शिकतांना येणारा अनुभव आपणविसरत नाही.आठवणीच्या रुपाने अनुभव जिवंत रहातात.गत आयुष्य हा आपला अनुभवच असतो.
ज्या गोष्टींचा अनुभव नसतो त्याची जिज्ञासा कायम असतेकाही अनुभव चूकीचेही असतात.अज्ञानी आणि मूर्ख व्यक्ति अनुभवी नसते.ते अनुभव कधीच उपयोगी पडत नाही.
काळाच्या कसोटीवर ते टिकत नाही.
मला याचा अनुभव नाही,
असाप्रामाणिकपणा काहींकडेअसतो तर अनुभव नसून तो असल्याचा कांगावा केलाजातो.अर्धवट अनुभवी ही असतात.
अनुभव सहज मिळणारे तसे फार मोबदला घेऊन जाणारे
असतात.अनुभवाचे ज्ञान टिकाऊ असते.अनुभवी लोकांकडून सल्ले घेतले जातात.अनुभव नसेल तर सल्ला
देण्याचा मोह टाळता आला पाहिजे.
अनुभवाचे आदान प्रदान करायचे असते आणि जीवनअधिक समृद्ध करायचे असते.इतरांकडून शिकण्यासारखे
खुप असते.अंहकारी ते मान्य करत नाही म्हणून तो कायम अज्ञानी रहातो.
अनुभवी व्यक्तिचे बोल ताकतीचे असतात.अनुभवाचा सुगंध त्या ठिकाणी असतो.प्रत्यक्ष अनुभव असल्याविना
आपण मान्य करण्यास तयार नसतो, किंबहुना ज्या गोष्टींचा अनुभव नाही ,त्या अमान्य करण्याकडे आपला कल असतो.अनुभव घेण्यासाठी देखील बुद्धी,मन तसेअसावे लागते."दिल्ली में रहकर भाड झोकनेवाले" कमी नसतात.
संपर्क आणि सहवासात देखील अनुभव येतात.जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ,असे उगीच म्हणत नाही.अनेक गोष्टीतले दु:ख आणि आनंद याचा आपणाकडे अनुभव नसतो.इतरांना आपण चूक ठरवितो.
अनुभवांची एक उंची असते.काहींना ती गाठता येते.तेवंदनीय ठरतात.बुद्धाला बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्तझाले याचा अर्थ प्रत्येकालाच ते होईल असे नाही.ज्याची त्याची योग्यता आणि अनुभव असतात.
माणसाचेहे वेगळेपण त्यास महत्त्व प्राप्त करुन देते.जीवन म्हणजे अनुभवाचे संचित असते. पुढच्याच ठेस मागचा शहाणा ठरतो.अनुभवाचे गाठोडे घेऊन परलोकात जायचे असते,तिथले अनुभव घेण्यासाठी.